Gautami Patil: गौतमी पाटीलचा ग्लॅमरस अवतार, स्विमिंग पूलमध्ये ‘टीप टीप बरसा पाणी’ वर केला डान्स; VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील हिचं नाव घेतलं की तिच्या डान्स शोमध्ये उसळणारी गर्दी आणि चाहत्यांच्या आरोळ्या डोळ्यासमोर येतात.
मुंबई : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचं नाव घेतलं की तिच्या डान्स शोमध्ये उसळणारी गर्दी आणि चाहत्यांच्या आरोळ्या डोळ्यासमोर येतात. पण यावेळी गौतमी तिच्या मंचावरील ठसकेबाज नृत्यामुळे नाही, तर एका खास व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गौतमी ‘टीप टीप बरसा पाणी’ या सुपरहिट गाण्यावर स्विमिंग पूलमध्ये ठुमके लगावताना दिसत आहे.
गौतमीचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत. तिच्या एका-एका अदा पाहून कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. काही चाहते तर “गौतमी म्हणजे मराठीची बिपाशा बसू” असं म्हणत तिच्या सौंदर्याचं वर्णन करत आहेत.
advertisement
विशेष म्हणजे, फक्त मंचावरच्या डान्समुळेच नव्हे तर गौतमी आता एक सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर लाखोंची व्ह्यूज मिळतात, चाहत्यांकडून प्रतिक्रिया आणि लाईक्सचा वर्षाव होतो. कमाईबाबतही गौतमी टॉपवर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका डान्स शोसाठी ती तब्बल 3 ते 5 लाख रुपये घेते. तिच्या टीमची महिन्याची कमाई सुमारे 45 ते 50 लाखांच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. यामुळे गौतमीला आजच्या घडीला मराठीची ‘डान्सिंग क्वीन’ म्हटलं जातं.
advertisement
*VIDEO : 'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलच्या मनमोहक अदा, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ केला शेअर* pic.twitter.com/zaXLrCxPJZ
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) September 2, 2025
डान्सशिवाय गौतमी पाटीलनं ‘देवमाणूस’ या मालिकेतही विशेष भूमिका साकारली आहे. हळूहळू ती फक्त नृत्यांगणा न राहता अभिनयाच्या क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहे. आजच्या घडीला गौतमी पाटीलला कोणत्याच ओळखीची गरज नाही. तिच्या कार्यक्रमात होणारी हाऊसफुल्ल गर्दी आणि सोशल मीडियावर मिळणारा प्रचंड प्रतिसाद हेच तिच्या लोकप्रियतेचं मोठं प्रमाण आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 4:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil: गौतमी पाटीलचा ग्लॅमरस अवतार, स्विमिंग पूलमध्ये ‘टीप टीप बरसा पाणी’ वर केला डान्स; VIDEO


