DP दादाने लग्नाबद्दल विचारताच गौतमी पाटील लाजली, छोटा पुढारीचा झाला पोपट, नक्की काय घडलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gautami Patil Marriage : महाराष्ट्राची लावणी क्वीन गौतमी पाटील, 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमातून टेलिव्हिजनवर दिसत आहे. तिच्या लग्नाविषयीच्या चर्चेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई: महाराष्ट्राची लावणी क्वीन आणि सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटील सध्या तिच्या नृत्याने स्टेज गाजवत असली, तरी आता ती एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहवरील 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमातून ती टेलिव्हिजनवरही तिची जादू दाखवत आहे. नुकताच या कार्यक्रमातील एक किस्सा जोरदार व्हायरल झाला आहे, जिथे चक्क तिच्या लग्नाबद्दल चर्चा रंगली!
गौतमी पाटील तिच्या दमदार नृत्यासाठी आणि महाराष्ट्रातील प्रचंड लोकप्रियतेसाठी ओळखली जाते. तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी हे तिची क्रेझ किती आहे हे दाखवून देते. आता हीच गौतमी 'स्टार प्रवाह'सारख्या मोठ्या वाहिनीवर दिसू लागल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
धनंजय पोवार आणि 'छोटा पुढारी'मुळे रंगली लग्नाची चर्चा!
'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमात गौतमीसोबतच रीलस्टार धनंजय पोवार आणि महाराष्ट्राचा लाडका 'छोटा पुढारी' घनश्याम दरोडे यांनीही हजेरी लावली होती. याच दरम्यानचा गौतमी, धनंजय आणि छोट्या पुढारीमधील एक मजेदार संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धनंजय पोवार गौतमीला थेट लग्नाबद्दल विचारतो, "गौतमी, लग्नाबद्दल काय विचार केलाय?" यावर गौतमी थोडी गोंधळते आणि म्हणते, "काय बोलू मी आता? अहो, म्हणू की काय म्हणू?" तिच्या या उत्तराने प्रेक्षकांमध्ये हशा पिकतो. त्यानंतर धनंजय लगेच खुलासा करतो, "मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे... घनश्यामबद्दल बोलत आहे."
advertisement
advertisement
छोट्या पुढारीचं स्वप्न भंगलं, गौतमी म्हणाली 'माझा लहान भाऊ'!
घनश्यामचं नाव काढताच, तिकडे छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडेच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो. पण गौतमीने लगेच त्याला 'भाऊ' बनवून टाकले. ती म्हणाली, "हे माझ्या लहान भावासारखं वाटतंय." गौतमीने असं म्हणताच छोट्या पुढारीचं लग्नाचं स्वप्न जागेवरच भंगलं, पण हा संवाद प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरला आहे.
advertisement
गौतमी पाटील आता केवळ एक नृत्यांगना म्हणून मर्यादित राहिलेली नाही, तर ती एक टेलिव्हिजन कलाकार म्हणूनही आपली ओळख निर्माण करत आहे. यापूर्वी ती मराठी गाण्यांमध्ये डान्सर म्हणून काम करत होती आणि अनेक स्टेज शोसाठी तिला निमंत्रित केले जायचे. पण आता 'स्टार प्रवाह'सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर विविध कार्यक्रमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ज्यामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 07, 2025 7:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
DP दादाने लग्नाबद्दल विचारताच गौतमी पाटील लाजली, छोटा पुढारीचा झाला पोपट, नक्की काय घडलं?