Gautami Patil : संध्या यांच्या 50 वर्ष जुन्या लावणीवर थिरकली गौतमी पाटील, 'ज्वानीच्या आगीची मशाल' आता नव्या ढंगात

Last Updated:

Gautami Patil : 'दिसला गं बाई दिसला 2.o' या जुन्या ठेक्याला गौतमी पाटीलने नव्या ढंगात सादर केलं आहे. 'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटात गौतमी ज्वानीच्या आगीची मशाल हातीवर नव्या ढंगात थिरकताना दिसणार आहे.

News18
News18
Gautami Patil : 'पिंजरा' हा 1972 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट चांगलाच गाजला. आजही या चित्रपटातील गाणी अनेकांच्या ओठांवर आहेत. 'पिंजरा'प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटातील 'दिसला ग बाई दिसला' या संध्याच्या गाण्यावर आता गौतमी पाटील थिरकताना दिसणार आहे. 'प्रेमाची गोष्ट 2’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच, या चित्रपटातील तिसरं गाणं 'दिसला गं बाई दिसला 2.o’ सध्या प्रचंड गाजतंय. आधीच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पहिल्या दोन गाण्यांनंतर हे गाणंही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये झळकू लागलं आहे. ‘दिसला गं बाई दिसला 2.o’ या नव्या आवृत्तीने जुन्या आठवणींना नवा झगमगाट दिला आहे. गौतमी पाटीलच्या अफाट एनर्जीने आणि ललित प्रभाकरच्या जबरदस्त साथीनं या गाण्याला एक वेगळंच रूप मिळालं आहे. राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांच्या जोशपूर्ण संगीतासह जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांचे बोल लाभलेलं हे गाणं अधिकच श्रवणीय बनलं आहे. राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांच्या आवाजात हे गाणं आणखीनच रंगतदार झालं आहे. पॉल मार्शलच्या चैतन्यपूर्ण नृत्यदिग्दर्शनाने यात अधिकच रंगत आली आहे.
गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने अनेकांना वेड लावलं आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच गौतमीने घायाळ केलं आहे. डान्स शो करणारी गौतमी आता 'प्रेमाची गोष्ट 2'च्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवायला सज्ज आहे. ‘दिसला गं बाई दिसला 2.o’ हे गाणं संगीतप्रेमींच्या पसंतीस येण्याचं कारण म्हणजे, गाण्याचे पूर्वीचे बोल आणि नव्या बीट्सचा सुंदर संगम. पारंपरिक तालात आधुनिक झंकाराची मिसळ, आणि गौतमी पाटीलच्या स्फूर्तीदायक सादरीकरणामुळे हे गाणं तरुणाईचं नवीन फेव्हरेट ठरतंय.
advertisement
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, ‘दिसला गं बाई दिसला 2.o’ हे गाणं तयार करतानाच आमच्या मनात तरुणाई होती. जुनं गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचं होतं, परंतु त्याचा सार कायम ठेवायचा होता. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे गाण्याला जिवंतपणा आला आणि तिचा परफॉर्मन्सच या गाण्याचं आकर्षण ठरलं.”
advertisement
'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास असणारा 'प्रेमाची गोष्ट 2' हा चित्रपट 21 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे आता 'प्रेमाची गोष्ट 2'कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil : संध्या यांच्या 50 वर्ष जुन्या लावणीवर थिरकली गौतमी पाटील, 'ज्वानीच्या आगीची मशाल' आता नव्या ढंगात
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement