advertisement

Siddhant Chaturvedi Movie: सिद्धांत चतुर्वेदीला साकारायची आहे 'सिक्सर किंग'ची भूमिका, व्यक्त केली मनातली इच्छा

Last Updated:

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना टीम इंडियातील काही प्रसिद्ध क्रिकेटरची भूमिका साकारायची आहे. त्यापैकी एक सिद्धांत चतुर्वेदी. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने त्याचा ड्रीम रोल एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

gully boy actor siddhant chaturvedi wants to play a lead role in yuvraj singhs biopic he also expressed his desire in an interview
gully boy actor siddhant chaturvedi wants to play a lead role in yuvraj singhs biopic he also expressed his desire in an interview
मुंबई: टीम इंडियाचा महान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकची गेल्या काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये क्रिकेटर युवराज सिंगच्या भूमिकेत 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी दिसणार असल्याची चर्चा आहे. 'गली बॉय' चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या सिद्धांत चतुर्वेदीच्या मनामध्ये अनेक वर्षांपासून भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची भूमिका साकारण्याची इच्छा आहे, त्याला दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये काम करायचे आहे. एका मुलाखतीत त्याला कोणत्या खेळाडूची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारायला आवडेल, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना, त्याने लगेच युवराज सिंगचं नाव घेतले.
युवराजच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक टप्प्यांतून आपल्याला खूप काही शिकता येईल, या अनुषंगाने त्याने आपली मनातली इच्छा व्यक्त केली आहे. सिद्धांत चतुर्वेदीचं क्रिकेटसोबतचं फार गहिरं नातं आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धांतने आपल्या फिल्मी करियरची सुरूवात "इनसाइड एज" वेब सिरीजच्या माध्यमातून केली आहे. त्या चित्रपटामध्ये क्रिकेटचे अनेक गुपिते उलगडण्यात आले आहे. त्यानंतर सिद्धांतने "गेहराईयाँ" आणि "खो गये हम कहाँ" सारख्या चित्रपटांतून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षे पूर्ण केल्यानंतर, सिद्धांतने महत्त्वाचं भाष्य केले आहे, तो म्हणाला की, नेटवर्किंग किंवा पीआरच्या खेळामध्ये मी पक्का नाही. स्वतःला कसे सादर करायचे हे माहित नाही. कलाकाराची खरी ओळख, हे त्याचं काम असावं, असं सिद्धांतचं मत आहे.
advertisement
आजच्या युगात, जिथे प्रत्येकजण सुपरस्टार बनण्यासाठी स्पर्धा करत आहे. युवराज सिंगला स्वत:चा "आयकॉन" समजणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीला स्वत:ला ग्लॅमर दुनियेत हरवून द्यायचे नाही. तो म्हणतो की जेव्हा आपण, कोणत्याही गोष्टीची शुन्यापासून सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला त्या बद्दलचे वास्तव माहिती असते. त्यामुळे तुम्ही खोट्या लोकांपासून दूर राहणंच महत्त्वाचं समजता. सिद्धांतला आशा आहे की, त्याला एकदा तरी का होईना, युवराज सिंगची भूमिका आणि त्याचा संघर्ष मोठ्या पडद्यावर साकारण्याची संधी मिळेल. सध्या सिद्धांत ‘दो दीवाने शहर में’ चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. त्याचा हा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशापद्धतीने बॅटिंग करतो, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. सिद्धांथ चतुर्वेदीसोबत या चित्रपटातून मृणाल ठाकूर सुद्धा प्रमुख भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 20 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशामध्ये रिलीज होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Siddhant Chaturvedi Movie: सिद्धांत चतुर्वेदीला साकारायची आहे 'सिक्सर किंग'ची भूमिका, व्यक्त केली मनातली इच्छा
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement