Hardik Pandya Girlfriend: नताशा, जास्मिननंतर हार्दिक पांड्याने दाखवला नव्या GF चा चेहरा, मॅचिंग आउटफिटमध्ये झाले स्पॉट, VIDEO VIRAL

Last Updated:

Hardik Pandya Girlfriend: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे पण यावेळी त्याच्या क्रिकेटसाठी नव्हे, तर त्याच्या नव्या लव्ह लाइफमुळे.

 हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड
हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे पण यावेळी त्याच्या क्रिकेटसाठी नव्हे, तर त्याच्या नव्या लव्ह लाइफमुळे. नताशा स्टॅन्कोविकपासून झालेल्या विभक्तीनंतर हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत नवनवीन चर्चा रंगत आहेत. आता त्याचं नाव मॉडेल माहिका शर्मा सोबत जोडलं जात आहे. नुकताच दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अलीकडेच मुंबईत हे दोघे एकत्र दिसले. हार्दिक त्याच्या आलिशान गाडीतून उतरला आणि काही क्षणांनी माहिका त्याच्याकडे चालत आली. ती त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करते, पण हार्दिक पटकन हात मागे घेतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आत नेतो. दोघांनी पापाराझींसाठी पोज देणं टाळलं, पण कॅमेऱ्यात सगळं कैद झालं आणि तिथूनच चर्चांना सुरुवात झाली.
advertisement
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पहायला मिळाला. काहींनी लिहिलं, “हार्दिकची पसंती बदलते पण स्टाइल नाही” तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या, “दोघेही अगदी जुळे दिसतात.”
हार्दिकची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्मा 24 वर्षांची असून ती मॉडेल आहे. आणि ती योगा प्रशिक्षक आहे. तिने दिल्ली, गुजरात आणि अमेरिकेत शिक्षण घेतलं आहे. माहिका अनेक अ‍ॅड फिल्म्स आणि फॅशन शोमध्ये झळकली आहे, तसेच मनीष मल्होत्रा यांसारख्या टॉप डिझायनर्ससोबतही तिने काम केलं आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 41 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यात अर्जुन कपूरसारखे बॉलिवूड स्टार्सही आहेत.
advertisement
advertisement
हार्दिक आणि माहिकामध्ये तब्बल 7 वर्षांचं वयाचं अंतर आहे, पण त्यांची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणतात “प्रेमाला वयाचं बंधन नसतं!”
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Hardik Pandya Girlfriend: नताशा, जास्मिननंतर हार्दिक पांड्याने दाखवला नव्या GF चा चेहरा, मॅचिंग आउटफिटमध्ये झाले स्पॉट, VIDEO VIRAL
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement