'हे तर ठरलेलं नॉमिनेशन...', BIGG BOSS चा टास्क पाहून भडकली हिना खान, थेट मेकर्सवर केले फिक्सिंगचे आरोप

Last Updated:

Bigg Boss 19 : नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमुळे या शोवर एक गंभीर आरोप झाला आहे. विशेष म्हणजे, हा आरोप खुद्द 'बिग बॉस ११' ची फर्स्ट रनर-अप राहिलेल्या हिना खानने केला आहे.

News18
News18
मुंबई : सुपरस्टार सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' सध्या वादविवाद, भांडणं आणि नॉमिनेशनच्या गदारोळामुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमुळे या शोवर एक गंभीर आरोप झाला आहे. विशेष म्हणजे, हा आरोप खुद्द 'बिग बॉस ११' ची फर्स्ट रनर-अप राहिलेली आणि प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने केला आहे. हिनाने थेट शोवर फिक्सिंगचा आरोप करत शोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

"लॉकर्सच्या मागे फोटो बदलले गेले?"

हिना खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून 'बिग बॉस'च्या निर्मात्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. हिना खानने नॉमिनेशन प्रक्रियेवर संशय व्यक्त करत लिहिले, "जर 'फिक्स्ड नॉमिनेशन्स'ला कोणता चेहरा असता, तर तो अगदी असाच दिसला असता! सगळ्यात आधी बॉक्स उघडायला कोणाला पाठवायचे, हे ठरवण्यावरच सगळं अवलंबून असतं."
advertisement
तिने पुढे शोवर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे करत विचारले, "आणि हो, जर लॉकर नंबर निवडल्यानंतर मागच्या बाजूने फोटो बदलले जात असतील, तर आम्हाला काय माहित? जनता हे जाणून घेऊ इच्छिते. हे खूप दुःखद आहे की, या शोने आपला चार्म गमावला आहे."
advertisement
advertisement

लाडक्या स्पर्धकांचा बचाव करतंय बिग बॉस?

हा वाद 'लॉकर टास्क'वरून सुरू झाला आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना भिंतीवर लावलेल्या लॉकर्समधून एक नंबर निवडायचा होता. लॉकर उघडल्यावर ज्या स्पर्धकाचा फोटो बाहेर येईल, त्याला नॉमिनेट करायचे की सुरक्षित करायचे, याचा पर्याय मिळायचा.
या टास्कनंतर तीन स्पर्धक पूर्णपणे सुरक्षित झाले, त्यापैकी अमाल मलिक आणि अन्य दोन स्पर्धक हे शोच्या चॅनलचे लाडके मानले जातात. याउलट, नॉमिनेट झालेले स्पर्धक लोकप्रिय असूनही, ते धोक्यात आले. त्यामुळेच, ही नॉमिनेशन प्रक्रिया अमाल मलिकच्या बाजूने झुकलेली होती, असा हिना खानसह अनेक चाहत्यांचा आरोप आहे.
advertisement

शोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

हिना खानचा थेट आरोप आहे की, खेळाडूंनी नंबर निवडल्यानंतर, लॉकर उघडण्यापूर्वी मेकर्स पडद्यामागून त्यातील स्पर्धकाचा फोटो बदलू शकतात. हिना खान स्वतः 'बिग बॉस ११' ची फायनलिस्ट होती आणि तिने शोला मोठी टीआरपी दिली होती. तिच्यासारख्या मोठ्या आणि अनुभवी चेहऱ्याने केलेले हे आरोप 'बिग बॉस'च्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतात.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हे तर ठरलेलं नॉमिनेशन...', BIGG BOSS चा टास्क पाहून भडकली हिना खान, थेट मेकर्सवर केले फिक्सिंगचे आरोप
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement