दर तीन तासांनी खातो, तरी फिट अँड फाईन! काय आहे हृतिक रोशनचा फिटनेस फंडा?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Hrithik Roshan Diet Plan : बॉलिवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये हृतिक रोशनचा समावेश आहे. पन्नाशी पार केलेल्या ऋतिकचा फिटनेस हैराण करणारा आहे.
Hrithik Roshan Fitness Diet Plan : बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट अभिनेत्यांच्या यादीत हृतिक रोशनचं नाव आहे. नुकतचं 'वॉर 2' या चित्रपटातील हृतिकच्या कमाल बॉडी आणि फिटनेसने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. उपाशी राहणं किंवा डायटिंग करणं हृतिकला आवडत नाही. उलट दर दोन-तीन तासांनी काहीतरी खायला हृतिक आपली पसंती दर्शवतो. आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हृतिक काही गोष्टींची मात्र गांभीर्याने काळजी घेतो. त्यामुळे आजच्या तरुणांना इंप्रेस करण्यात हृतिक कुठेही कमी पडत नाही. हृतिक रोशन कठीण वर्कआऊट रुटिन फॉलो करतो. आपल्या डाएटचीदेखील तो पुरेपूर काळजी घेतो. हृतिकचा पर्सनल शेफ शुभम विश्वकर्मा हेल्थ शॉट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता,"जिथे बॉलिवूड सेलिब्रिटी इंटरमिटेंट फास्टिंग करतात किंवा दिवसातून एक वेळ खायला पसंती दर्शवतात तिथे हृतिक मात्र दर अडीच-तीन तासांनी खाणं पसंत करतो. रात्री 9 वाजेपर्यंत त्याचं खाणं सुरू असतं".
advertisement
हृतिक रोशनचं फिटनेस सीक्रेट काय?
हृतिक रोशन आज 51 वर्षांचा आहे. वयाच्या 51 व्या वर्षी मसल्स बनवण्यासाठी खास नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळेच हृतिक रोशन प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि हेल्टी फॅट्स घेतो. सर्व मायक्रोन्यूट्रिएंट्सयुक्त आहार करण्यावर हृतिक भर देतो.
हृतिक रोशन डाएट प्लॅन
हृतिक रोशनला नॉन व्हेज खायला आवडतं. मसल्ससाठी या गोष्टी उपयुक्त असतात त्या गोष्टी हृतिकच्या आहार असतात. डाएटमध्ये अंडी, चिकन आणि मासे या गोष्टींचा समावेश असतो. ग्रीक योगर्ट, ओट्स आणि क्विनोआदेखील असतं. दररोज न नुकता बिया आणि ड्रायफ्रूट्स खाण्यावर हृतिकचा भर असतो. प्रोटीनसाठी डाळ, राजमा, चने या गोष्टी तो खातो.
advertisement
हृतिक रोशनचं डाएटवर खूप लक्ष असतं. मशरूम खायला त्याला खूप आवडतं. वर्कआऊट आणि हेल्थी लाइफस्टाइल फॉलो करण्यावर हृतिकचा भर असतो. डाएटच्या दरम्यान हृतिक रोशन तंदूरी चिकन, बार्बेक्यू चिकन, कार्बोहायड्रेट असणारा बर्गर आणि ज्वारीचा बेस असणारा पिज्जा खायला हृतिकला आवडतं. गोडात प्रोटीन रिच ब्राउनी खायला हृतिकला आवडतं.
हृतिकला घरी बनवलेली मुगाची डाळ, भेंडीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि 1 वाटी दही खायला आवडतं. त्याच्या जेवणात रिफाइंड तेलाचा वापर करण्यात येत नाही. हृतिक रोशनसारखी फिट बॉडी तुम्हाला हवी असेल तर हे फिटनेस रुटीन जरुर फॉलो करा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 6:31 AM IST