शूटिंगदरम्यान Jr NTR ला दुखापत, नेमकं काय घडलं? चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Junior NTR Injury : ज्युनिअर एनटीआरला हैदराबादमधील एका स्टुडिओमध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
मुंबई : टॉलीवूडचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण, नुकतंच त्याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादमधील एका स्टुडिओमध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याच्या टीमने लगेचच याबद्दल माहिती दिली आणि चाहत्यांना काळजी न करण्याचं आवाहन केलं आहे.
नेमकं काय घडलं?
ज्युनिअर एनटीआरच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत फार गंभीर नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर त्याला लगेच प्राथमिक उपचार देण्यात आले. डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून तो पूर्णपणे बरा होऊ शकेल.
advertisement
ज्युनिअर एनटीआरच्या टीमने अधिकृत निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तो पुढील दोन आठवडे आराम करणार आहे. त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही, याची आम्ही खात्री देतो. कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.”

advertisement
शूटिंग थांबणार का?
सध्या ज्युनिअर एनटीआर दिग्दर्शक प्रशांत नीलच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जर त्याला पूर्णपणे बरं व्हायला जास्त वेळ लागला, तर चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो. त्याच्या टीमने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाहीये, पण चाहत्यांना आशा आहे की, तो लवकर बरा होऊन पुन्हा कामाला लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 6:22 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शूटिंगदरम्यान Jr NTR ला दुखापत, नेमकं काय घडलं? चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला