मराठमोळ्या सन्मानाने भारावली काजोल, आई तनुजाशी खास कनेक्शन; थेट मराठीतच सांगितलं, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kajol Raj Kapoor Award Tanuja Connection : अभिनेत्री काजोलचा राज्य शासनाकडून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचं काजोलचा तिच्या आईशी खास कनेक्शन आहे. ते कनेक्शन काय आहे ते काजोलनं थेट मराठीत भाषण करतच सांगितलं.
मुंबई : 5 ऑगस्ट 2025 रोजी अभिनेत्री काजोल हिने तिचा 51 वा वाढदिवस एका खास आणि भावनिक समारंभात साजरा केला. मुंबईत झालेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2025 च्या कार्यक्रमात तिला राज कपूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीत तीन दशकांहून अधिक काळ योगदान दिल्याबद्दल काजोलचा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचं काजोलचा तिच्या आईशी खास कनेक्शन आहे. ते कनेक्शन काय आहे ते काजोलनं थेट मराठीत भाषण करतच सांगितलं.
आई तनुजासोबत स्टेजवर भावनिक क्षण
या सोहळ्याची खास गोष्ट म्हणजे काजोलने तिच्या आई तनुजा यांच्यासोबत स्टेजवर हजेरी लावली. विशेष म्हणजे काजोलने आपल्या आईची एक जुनी साडी नेसली होती. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.
advertisement
मराठीत भाषण देताच टाळ्यांचा कडकडाट
काजोलनं रंगमंचावर मराठी भाषण केलं. तिचं मराठी ऐकून उपस्थित सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. काजोलचं अस्खलित मराठी ऐकून प्रेक्षकांच्या टाळ्या थांबल्या नाहीत. काजोलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान मिळाला. हा क्षण तिच्यासाठी अत्यंत मौल्यवान होता. काजोलने सांगितलं की, तिच्या आईलाही पूर्वी असाच सन्मान मिळाला होता, त्यामुळे हा पुरस्कार तिच्यासाठी खास ठरला.
advertisement
advertisement
भाषणाच्या शेवटी काजोलने हसत म्हटलं, "मला हा पुरस्कार माझ्या वाढदिवसा दिवशी मिळतो, मी खूप आनंदी आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. मी खूप आनंदी आहे की आज माझी आईही माझ्याबरोबर आहे. तिलाही आधी हा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस होता."
काजोलची खास पोस्ट
advertisement
काजोलने तिच्या सोशल मीडियावर सोहळ्याचे काही खास क्षण शेअर केलेत. पोस्टमध्ये काजोलनं लिहिलंय, "माझ्या आईने एकेकाळी ज्यावर पाऊल टाकलं होतं त्याच मंचावर आज मी चालत गेले आणि तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. असं वाटतंय जणू युनिव्हर्स मला सतत आठवतं करून देतंय की मी कुठून आले आहे आणि माझ्यासोबत नेहमी कोण आहे." अभिनेत्री तनुजा यांना 2014 साली राज्य शासनाने राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानीत केलं होतं. त्यानंतर 10 वर्षांनी त्यांची मुलगी अभिनेत्री काजोलला हा पुरस्कार देण्यात आला. काजोलला मिळालेल्या सन्मानासाठी सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 06, 2025 8:52 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मराठमोळ्या सन्मानाने भारावली काजोल, आई तनुजाशी खास कनेक्शन; थेट मराठीतच सांगितलं, VIDEO








