स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये TV अभिनेत्रीसोबत नको तो प्रकार, चुकून मैत्रिणीलाच केला शेअर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडला. अभिनेत्रीला मनस्पात करण्याची वेळ आली. सध्या सायबर पोलीस तिची मदत करत आहेत.
क्षेत्र कोणतंही असो महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा नेहमीच ऐरणीवर असतो. कलाकार असतील तर त्यांचा स्ट्रगल हा वेगळाच असतो. अनेकदा कलाकार अशा भागात शूट करत असतात जिथे व्यवस्थित सोयी सुविधा नसतात. कलाकारांना कसंतरी काम करावं लागलं. पण अनेक ठिकाणी कलाकारांसाठी खास सोयी करण्यात आल्या आहेत. एखाद्या मोठ्या ठिकाणी कलाकारांना योग्य त्या सोयी मिळतात. पण त्या जागा सुरक्षित असतीलच असं नाही. एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीबरोबर असाच प्रकार घडला. अभिनेत्री स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये गेली असता तिच्याबरोबर नको तो प्रकार घडला. हा प्रकार चुकून तिच्या मैत्रिणीलाच शेअर झाला.
32 वर्षीय एका टीव्ही अभिनेत्रीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीला तेव्हा काहीच कळलं नाही पण काही दिवसांनी संपूर्ण प्रकार तिच्या समोर आला आणि ती पूर्णपणे हादरून गेली. लेडिज टॉयलेटमध्ये तिचा गुपचूप व्हिडीओ शूट करण्यात आला. नंतर हा व्हिडीओ व्हायरल करू असं सांगून ब्लॅकमेल करण्यात आलं. अभिनेत्रीनं संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर क्राईम पोलील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
advertisement
या अभिनेत्री नाव समोर आलेलं नसतं तरी ती कन्नट टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ही घटना बेंगळुरू येथे घडल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री एका इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमासाठी गेली होती. 6 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान हा प्रकार घडल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार 7 फेब्रुवारी रोजी ती स्टेडियममधील लेडिज टॉयलेटचा वापर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा अश्लील व्हिडीओ शूट केला आहे.
advertisement
घटनेनंतर काही दिवसांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असल्याची माहिती तिला मिळाली. आरोपीने तो व्हिडीओ Instagramवरील एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर पाठवला होता. ज्या अकाउंटवर व्हिडीओ पाठवण्यात आला ते अकाउंट अभिनेत्रीच्या मैत्रिणीचे होते. मात्र आरोपीला चुकीने ते अकाउंट पीडित अभिनेत्रीचेच आहे असे वाटले. यानंतर खऱ्या अर्थाने ब्लॅकमेलिंगला सुरुवात झाली. आरोपीने अभिनेत्रीशी संपर्क साधून तिचे आणखी खासगी व्हिडीओ असल्याचा दावा केला. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिची बदनामी केली जाईल अशीही धमकी दिली.
advertisement
या संपूर्ण प्रकारानंतर अभिनेत्रीनं सायबर पोलिसांत धाव घेतली. घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटचा स्रोत शोधणे, व्हिडीओ नेमका कुठून शूट करण्यात आला, आरोपीची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 5:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये TV अभिनेत्रीसोबत नको तो प्रकार, चुकून मैत्रिणीलाच केला शेअर






