Ankita Walawalkar : लेकीसाठी पहिल्यांदा मुंबईत आले अंकिता वालावलकरचे वडील, कोकण हार्टेड गर्लला अश्रू अनावर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिला खास सरप्राईज देणार आहे. अंकिताची एक इच्छा बिग बॉस पूर्ण करणार आहेत.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. घरातील सगळेच सदस्य त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आतूर झाले आहेत. कालच्या भागात डीपी दादा, अभिजीत सावंत, वर्षा ताई, जान्हवी यांची फॅमिली घरात आली होती. आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिला खास सरप्राईज देणार आहे. अंकिताची एक इच्छा बिग बॉस पूर्ण करणार आहेत.
बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात अंकिताच्या दोन बहिणी घरात आल्याचं पाहायला मिळतंय. तिघी बहिणी एकमेकींना मिठी मारून ढसाढसा रडू लागतात. तेवढ्यात बिग बॉस अंकिताला आणखी एक सरप्राईज देतात. अंकिताचे वडील बिग बॉसच्या घरात एंट्री करतात.
( हे फक्त बापच करू शकतो! वडिलांनी स्वतःचं रक्त विकून भरली होती जान्हवीची स्कूल फी, अंगावर काटा आणणारा प्रसंग )
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, अंकिताचे बाबा घरात येताच अंकिता शॉक होते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती “बाबा” असं म्हणत मोठ्याने ओरडते आणि त्यांना मिठी मारते. वडिलांना बघून अंकिताला अश्रू अनावर होतात. अंकिता बिग बॉसचे आभार मानत म्हणते, “थँक्यू बिग बॉस तुम्ही माझ्या बाबांना पहिल्यांदा मुंबईत आणलं आहे.”
advertisement
सांगायचं झाल्यास अंकिताचे वडील कधीच मुंबईत आले नव्हते. अंकिताने तिच्या व्हिडीओमध्येही अनेकदा याविषयी भाष्य केलं. अंकिता शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत राहायला आली. त्यांनंतर तिनं युट्यूब क्षेत्रात नाव कमावलं. कोकणात तिच्या गावी तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यात तिला तिच्या कुटुंबियांची मोठी साथ मिळाली. अंकिता तिच्या बहिणी आणि आईबरोबर अनेकदा मुंबईत येते. पण तिचे वडील आजवर कधीच मुंबईत आले नव्हते. बिग बॉसच्या निमित्तानं अंकिताचे वडील पहिल्यांदा मुंबईत आलेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2024 8:33 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ankita Walawalkar : लेकीसाठी पहिल्यांदा मुंबईत आले अंकिता वालावलकरचे वडील, कोकण हार्टेड गर्लला अश्रू अनावर