'कोकण हार्टेड बॉय'अखेर समोर, काय करतो अंकिता वालावलकरचा नवरा?

Last Updated:

who is ankita walawalkar husband kunal bhagat : अंकिता बिग बॉसमधून बाहेर येताच लग्न करणार आहे असं तिने सांगितलं पण तिचा होणारा नवरा कोण आहे हे तिनं गुलदस्त्यात ठेवलं. पण दसऱ्याच्या मुहूर्तावर अखेर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे.

अंकिता वालावलकर
अंकिता वालावलकर
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठीची स्पर्धक अंकिता प्रभू वालावलकर ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कोकण हार्टेड गर्लचा कोकण हार्टेड बॉय नेमका कोण आहे याचा चाहते शोध घेत आहेत. अंकिता बिग बॉसमधून बाहेर येताच लग्न करणार आहे असं तिने सांगितलं पण तिचा होणारा नवरा कोण आहे हे तिनं गुलदस्त्यात ठेवलं. पण दसऱ्याच्या मुहूर्तावर अखेर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे.
अंकिताने तिच्या कोकण हार्टेड बॉयची घोषणा केली तेव्हापासून चाहत्यांनी त्याचा शोध घेणं सुरू केलं होतं. अखेर त्यांनी लावलेला अंदाच बरोबर ठरला. कुणाल भगत हाच अंकिताचा होणारा नवरा आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करून दिली आहे.
advertisement
सूर जळले... असं म्हणत अंकिताने दोघांचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर अंकिताने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने लिहिलंय, प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगीतलस,काळाच्या ओघात कळलच नाही.आयुष्य कसं कुठे बदललं,तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं.
वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन. दसऱ्याच्या शुभेच्छा
advertisement
advertisement
अंकितच्या नवऱ्याने देखील अंकिताला शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने लिहिलंय, तु आयुष्यात आलीस आणि खरं प्रेम ह्या शब्दाचा अर्थ कळला...आपल्या आयुष्यातला सगळयात मोठा निर्णय...आपण लग्न करतोय.तुला खुश ठेवणं,तुला हसवणं,आता माझी सवय झाली आहे..आणि ही माझी सवय नेहमी आशीच ठेवेन …Trust Me. माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा
advertisement
advertisement
कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे.कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे. अंकिता आणि कुणाल यांनी आनंदवारी हे गाणं एकत्र केलं होतं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कोकण हार्टेड बॉय'अखेर समोर, काय करतो अंकिता वालावलकरचा नवरा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement