Nikhil Bane : "अखेर माझ्या आयुष्यात 'ती' आली; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत

Last Updated:

Nikhil Bane Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेच्या घरी नवी पाहुणी आली आहे. चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

News18
News18
Nikhil Bane Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला निखिल बने सध्या चर्चेत आहे. आपल्या सटल विनोदच्या बळावर निखिलने प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान निर्माण केलं आहे. एकीकडे आपल्या स्किटमुळे चर्चेत असणारा बने आता आपल्या नव्या पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. 'अखेर माझ्या आयुष्यात ती आली...', असं म्हणत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. निखिल बनेवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. निखिल बनेच्या आयुष्यात नक्की कोण आली, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
निखिल बनेची पोस्ट काय? (Nikhil Bane Post)
निखिल बनेने "अखेर माझ्या आयुष्यात ती आली... माझी 'Dream Bike", अशी पोस्ट लिहिली आहे. त्याच्या पोस्टने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भांडूपच्या चाळीत लहानाचा मोठा झालेल्या निखिलसाठी स्वप्नातली बाईक घेणं ही खरंतर मोठी गोष्ट होती. पण आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वप्नातली ड्रीम बाईक अर्थात पिवळ्या रंगाची 'triumph scrambler 400cc' घेतली आहे. निखिलच्या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अभिनंदन भावा, कडक, एक नंबर, चलो अभी रोड ट्रिपवर चलते है, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो, आज खऱ्या अर्थाने दिन बने, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)



advertisement
निखिल बनेचं बालपण भांडूपच्या चाळीत गेलं आहे. कोकणातल्या निखिल बनेचं महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये झालं. महाविद्यालयात असतानाच त्याला अभिनयाचं वेड लागलं. कॉलेजमध्ये असताना विविध एकांकिका स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला. फक्त भागच घेतला नाही तर अनेक पारितोषिकदेखील पटकावले. कॉलेजनंतर निखिलला खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात ब्रेक मिळाला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करण्यासह निखिल अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही काम करताना दिसून येत आहे. स्वत:चं घर घेण्याचं निखिलचं आता स्वप्न आहे. निखिलच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nikhil Bane : "अखेर माझ्या आयुष्यात 'ती' आली; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement