भाईजान सारखा शर्टलेस, पठाण सारखे 6 पॅक्स; मनोज वाजपेयीनं का शेअर केले असे शर्टलेस फोटो?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
वयाच्या 54व्या वर्षी देखील फिट अँड फाइन असलेल्या मनोज वाजपेयीचं चाहत्यांनी कौतुक केलंय. विशेष म्हणजे तरूणी तर मनोजच्या फोटोवर फिदा झाल्यात.
मुंबई : सगळीकडे नव्या वर्षाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. नव्या वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी आपल्या आवडत्या ठिकाणी गेले आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत अनेकांना फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. अनेकांच्या शुभेच्छांवर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीचा बहुगुणी अभिनेता मनोज वाजपेयी यानं मात्र त्याचे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. वर्षाच्या पहिल्या दिवशी चाहत्यांना शुभेच्छा देण्याऐवजी शर्टलेस फोटो मनोजनं का शेअर केलेत असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
अभिनेता मनोज वाजपेयीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या त्याच्या शर्टलेस फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सलमान खानसारखी शर्टनेस स्टाइल आणि शाहरूख खानच्या पठाणसारखे सिक्स पॅक्स या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. वयाच्या 54व्या वर्षी देखील फिट अँड फाइन असलेल्या मनोज वाजपेयीचं चाहत्यांनी कौतुक केलंय. विशेष म्हणजे तरूणी तर मनोजच्या फोटोवर फिदा झाल्यात.
advertisement
मनोज वाजपेयीनं त्याच्या शर्टलेस फोटोसह खास कॅप्शन देखील लिहिलं आहे. 'न्यू इअर न्यू मी. d̶e̶l̶i̶c̶i̶o̶u̶s̶ सूपचा माझ्या शरीरावर प्रभाव पहा. एकदम किलर लुक आहे की नाही?' अस कॅप्शननं मनोजनं या फोटोला दिलं आहे. हे कॅप्शन आणि फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्स करत लिहिलंय, 'भाई मां कसम मनोज फायर लग रहे हो.' तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, 'हे सिक्स पॅक तू कुठे लपवले होते?' तर अनेकांनी फायर इमोजी शेअर करत मनोजच्या शर्टलेस फोटोला पसंती दर्शवली आहे.
advertisement
आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मनोजनं त्याचा शर्टलेस फोटो का शेअर केला? हा प्रश्न राहिलाच. याचं कारण फार स्पेशल आहे. मनोजचा शर्टलेस फोटो त्यावरील कॅप्शन हे त्याच्या नव्या प्रोजेक्टचं प्रमोशन आहे.
advertisement
मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा यांची क्राइम थ्रिलर वेब सीरिज 'किलर सूप' येत्या 11 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2024 11:37 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भाईजान सारखा शर्टलेस, पठाण सारखे 6 पॅक्स; मनोज वाजपेयीनं का शेअर केले असे शर्टलेस फोटो?