समोर 21वर्षांचा मुलगा अन् थेट गुडघ्यावर बसून दुसऱ्या बायकोला अरबाजनं केलं प्रपोज, Video
- Published by:Minal Gurav
Last Updated:
शूराला प्रपोज करणाऱ्या अरबाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. शूराच्या फॅन पेजवरून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई : अभिनेता आणि निर्माता अरबाज खान यानं नुकतंच दुसरं लग्न केलं. मेकअप आर्टिस्ट असलेल्या शूरा खानबरोबर त्यानं लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसातच अरबाज आणि शूरा हे हनिमूनसाठी गेलेत. दोघांनी एकत्र नव्या वर्षाचं स्वागत केलं. अरबाजनं घटस्फोटानंतर तब्बल 5 वर्षांनी शूराबरोबर लग्न केलं. दोघांच्या लग्नाची चर्चा देखील झाली. आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या शूराला अरबाजनं गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. एकट्यात नाही तर अरबाजनं संपूर्ण खान कुटुंबाच्या समोर शूराला प्रपोज केलं होतं. लेक अरहान हा देखील तिथे उपस्थित होता.
शूराला प्रपोज करणाऱ्या अरबाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. शूराच्या फॅन पेजवरून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अरबाजचं संपूर्ण कुटुंब दिसतंय. सगळे डान्स करत असतात आणि मध्येच अरबाज शौराचा हात धरून गुडघ्यावर बसतो आणि फुलांचा मोठा गुच्छा तिच्या हातात ठेवत तिला प्रपोज करतो. या व्हिडीओ अरबाजची बहिण अर्पिता देखील दिसत आहे. शौरानं अत्यंत लाजत अरबाजचं प्रपोजल स्वीकारताना दिसतेय.
advertisement
हेही वाचा - बॉबीच्या 'जमाल कडू'ची धर्मेंद्र यांना भुरळ; ग्लास हातात घेत लेकाच्या गाण्यावर धरला ठेका, VIDEO
या व्हिडीओमध्ये महत्त्वाचं म्हणजे अरबाजचा मुलगा अरहान हा देखील तिथे उपस्थित होता. अरबाजनं मुलाच्या समोरच दुसरी बायको शूरा हिला प्रपोज केलं. अरबाज आणि शूराचा हा व्हिडीओ त्यांच्या लग्नाच्या 5 दिवस आधीचा आहे. 24 डिसेंबर 2023 रोजी अरबाज आणि शूरा यांनी लग्न केलं. बहिण अर्पिताच्या बंगल्यावर दोघांचा छोटेखानी निकाह सोहळा पार पडला. खान कुटुंब आणि बॉलिवूडमधील काही जवळची मंडळी या लग्नाला उपस्थित होते.
advertisement
advertisement
अरबाज आणि शूरा यांच्या लग्नाचे काही खास क्षण कॅमेरात कैद करण्यात आलेत. ज्यात खान कुटुंबानं मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं नव्या सुनेचं स्वागत केलं. अरबाजचा मोठा मुलगा अरहान यानं देखील त्याच्या नव्या आईचं स्वागत करण्यासाठी खास गाणं सादर केलं. दोघांनी तेरे मस्त मस्त दो नैन या गाण्यावर डान्स देखील केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2024 11:00 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
समोर 21वर्षांचा मुलगा अन् थेट गुडघ्यावर बसून दुसऱ्या बायकोला अरबाजनं केलं प्रपोज, Video