बॉबीच्या 'जमाल कडू'ची धर्मेंद्र यांना भुरळ; ग्लास हातात घेत लेकाच्या गाण्यावर धरला ठेका, VIDEO

Last Updated:

धर्मेंद्र यांनी थेट लेक बॉबी देओलच्या जमाल कडू या गाण्यावर ठेका धरला. धर्मेंद्र यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'जमाल कडू'वर धर्मेंद्रचा डान्स
'जमाल कडू'वर धर्मेंद्रचा डान्स
मुंबई : बिग बॉस 17मध्ये नव्या वर्षात स्वागत अगदी दणक्यात करण्यात आलं. शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी उपस्थिती लावली होती. सलमान खान, धर्मेंद्र आणि मीका सिंह यांनी शोमध्ये धम्माल आणली. त्यात सोहेल आणि अरबाज खान यांनीही एंट्री घेतली. खान आणि धर्मेंद्र एकत्र आल्यानंतर धम्माल तर होणारच. धर्मेंद्र यांनी थेट लेक बॉबी देओलच्या जमाल कडू या गाण्यावर ठेका धरला.
धर्मेंद्र कोणत्याही कार्यक्रमात आले की त्या कार्यक्रमाला चार चांद लावतात. सलमान खान आणि इतरांनी देखील धर्मेंद्र यांच्याबरोबर चांगला वेळ घालवला. धर्मेंद्र यांनी ग्लास हातात ठेवून बॅलेंन्स करण्याचा प्रयत्न करत डान्स केला. त्यानंतर त्यांनी थेट ग्लास तोंडात ठेवून डान्स केला. धर्मेंद्र यांना पाहून सलमान आणि अरबाज यांनी ग्लास डोक्यावर ठेवले. दरम्यान अभिनेता कृष्णा यांनी धर्मेंद्र यांच्या हातात असलेला रिकामी ग्लास पाहून पंच मारला. पंजाबी लोकांच्या हातात रिकामी ग्लॉस कोण देत? कृष्णाच्या या पंचवर एकच हशा पिकला.
advertisement
बिग बॉसच्या मंचावरची ही धम्माल पाहून प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. सलमान खानच्या विकेंड का वॉरमध्ये आयेशा खाननं चांगलाच राडा केला. तर सलमान खानानं मुनव्वरला चांगलाच छापलं. विकेंड का वॉरच्या मसाल्यानंतर बिग बॉसच्या प्रेक्षकांना धर्मेंद्र आणि इतर कलाकारांच्या एंट्रीनं नवीन वर्षाची मजेदार ट्रिट मिळाली.
advertisement
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

advertisement
धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलचा एनिमल हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला चांगली प्रेक्षक पसंती मिळाली. सिनेमातील बॉबीनं साकारलेला व्हिलन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. वयाच्या 54व्या वर्षी बॉबीनं स्वत: वर केलेली मेहनत मोठ्या पडद्यावर कहर करून केली. व्हिलन असूनही त्यानं हिरोच्या तोडीस तोड काम केलं. सिनेमातील त्याचं जमाल कडू हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप गाजतंय. गाण्यात त्यानं डोक्यावर दारूचा ग्लास ठेवून केलेला डान्स तर व्हायरल झालाय.
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉबीच्या 'जमाल कडू'ची धर्मेंद्र यांना भुरळ; ग्लास हातात घेत लेकाच्या गाण्यावर धरला ठेका, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement