Bigg Boss 17 च्या घरात सलमानचं रौद्ररूप! भाईजानचं बोलणं ऐकून बेशुद्ध पडली अभिनेत्री; अचानक घेतली एक्झिट

Last Updated:

वीकेंड का वारच्या प्रोमोने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे कारण एक स्पर्धक वैद्यकीय कारणांमुळे शोमधून बाहेर पडल्याची अपडेट समोर आली आहे. या स्पर्धकाला सलमान खानच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळेच चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. नक्की काय घडलं बिग बॉसच्या घरात जाणून घ्या.

बिग बॉस 17
बिग बॉस 17
मुंबई :  सध्या 'बिग बॉस 17' हा सीझन खूपच रंजक सुरु आहे. जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. बिग बॉस 17 चा या आठवड्याचा वीकेंड का वार खूप रंजक असणार आहे कारण हा यंदाच्या वर्षीचा 2023 चा शेवटचा वीकेंड का वार असेल. आता येणारा आठवडा रंजक असेल कारण BB17 चा फिनाले 28 जानेवारीला होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, वीकेंड का वारच्या प्रोमोने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे कारण एक स्पर्धक वैद्यकीय कारणांमुळे शोमधून बाहेर पडल्याची अपडेट समोर आली आहे. या स्पर्धकाला सलमान खानच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळेच चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. नक्की काय घडलं बिग बॉसच्या घरात जाणून घ्या.
'बिग बॉस 17'च्या प्रत्येक वीकेंड का वारमध्ये कोणी ना कोणी सलमान खानच्या रागाचा बळी ठरतो. वीकेंड का वारमध्ये संपूर्ण आठवडाभर स्पर्धकांमध्ये घडलेल्या घटनांवर सलमान खान प्रतिक्रिया देतो. यावेळी सलमान खान स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतो. पण आता सलमानच्या याच वागणुकीमुळे बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाची एक्झिट झाली आहे. एका स्पर्धकावर सलमान खान इतका चिडला की त्यामुळे तिला चक्कर येईन ती बेशुद्ध पडली.
advertisement
1 नाही दोनदा लग्न करणार आमिरची लाडकी लेक; 'या' ठिकाणी पार पडणार महाराष्ट्रीयन लग्न सोहळा
ही स्पर्धक आहे आयशा खान. आगामी एपिसोड्समध्ये भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे. नुकतंच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये सलमान खान चांगलाच रागावलेला दिसत आहे. तो आयशा खानला शोमध्ये येण्याचं कारण विचारतो. यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून सलमान खानचा राग आणखीच वाढतो. सलमान खान तिच्यावर इतकं चिडतो की ते ऐकून प्रेक्षक बघतच राहतात.
advertisement
प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, सलमान आयशाला विचारतो की, “या शोमध्ये येण्याचा उद्देश काय आहे?” उत्तर देताना आयशा म्हणते की, तिला 'मुनव्वरने माझी मागावी म्हणून मी इथे आली'. हे ऐकून सलमान संतापतो आणि म्हणतो, "तुला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी हवी होती?" भांडणं सगळ्यांमध्ये होतात. पण नॅशनल टेलिव्हिजनवर कोणी असं भांडत नाही. मुनव्वर स्टँड-अप कॉमेडियन म्हणून तू काय काय बोलतोस, आणि इथे तू एवढं देखील करू शकत नाहीस, इथे तुमच्यात भांडण नाही तर काहीतरी वेगळाच गेम सुरु आहे' असं म्हणत सलमानने दोघांचीही शाळा घेतली.
advertisement
सलमान खानच्या या बोलण्याने आयशा खान ढसाढसा रडू लागली. अंकितासमोर रडत रडत तिने स्वतःच स्पष्टीकरण दिलं की मी हे यासाठी केलं नाही. यानंतर आयशाने आपला सगळा राग मुनव्वरवर काढला. ती रडत मुनव्वरकडे जात, "मुनाव्वर, आजच्या नंतर कधीच मला तुझं तोंड दाखवू नकोस." असं म्हणत त्याच्यावर देखील ती भडकते.
advertisement
वीकेंड का वार दरम्यान आयशा बेशुद्ध पडल्याचे सांगितले जात आहे. एवढंच नाही तर वैद्यकीय कारणामुळे तिने शो मध्येच सोडला असल्याचं देखील बोललं जातंय. मात्र, बरी होताच आयशा परतणार असल्याची चर्चा आहे. आता आयशा या घरातून कायमची एक्झिट घेणार की पुन्हा परत खेळात सामील होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 17 च्या घरात सलमानचं रौद्ररूप! भाईजानचं बोलणं ऐकून बेशुद्ध पडली अभिनेत्री; अचानक घेतली एक्झिट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement