लग्नाशिवाय आई बनली 'ही' प्रसिद्ध गायिका, घरी आला चिमुकला पाहुणा; म्हणाली 'मला सगळं मिळालं'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
संगीतसृष्टीतून एक धाडसी निर्णय समोर आला आहे. एका लोकप्रिय गायिकेने समाजाच्या चौकटी मोडत लग्न न करता आई होण्याचा मार्ग निवडला.
मुंबई: संगीतसृष्टीतून एक धाडसी निर्णय समोर आला आहे. एका लोकप्रिय गायिकेने समाजाच्या चौकटी मोडत लग्न न करता आई होण्याचा मार्ग निवडला. ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही निरोगी असून, ही आनंदाची बातमी समजताच सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
ही गायिका दुसरी-तिसरी कोणी नसून भोजपुरीतील लोकप्रिय गायिका देवी आहे. देवीने स्वतःच ही माहिती फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली. पोस्टमध्ये ती म्हणाली, "माझं आयुष्य आता पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. मला जगातील सर्वात मोठा आनंद मिळाला आहे."
देवीने मातृत्व मिळवण्यासाठी जर्मनीतील स्पर्म बँकेच्या मदतीने आयव्हीएफ तंत्राचा वापर केला. पहिल्यांदा प्रयत्न अयशस्वी झाला होता, पण यावेळी तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिने स्पष्ट सांगितलं की तिला नेहमीपासूनच आई व्हायचं होतं, आणि आता तिची इच्छा पूर्ण झाली.
advertisement

bhojpuri singer devi
देवी भोजपुरीतील नामांकित गायिका आहे. त्यांच्या ‘सोलाह सावन भैल उमरिया’, ‘हमरो बालम भोजपुरिया’ आणि अनेक छठ गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. अनेकांनी त्यांना “नव्या पिढीला मार्गदर्शक” म्हणत शुभेच्छा दिल्या. जरी काहींनी मुलाला वडिलांच्या प्रेमाची उणीव राहील अशी चिंता व्यक्त केली, तरी बहुतेकांनी देवीच्या धाडसाचं कौतुक केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 2:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
लग्नाशिवाय आई बनली 'ही' प्रसिद्ध गायिका, घरी आला चिमुकला पाहुणा; म्हणाली 'मला सगळं मिळालं'