Maharashtrachi Hasyajatra : 'काहीतरी चुकीचं...', अखेर विशाखा सुभेदारने सांगितलं महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्याचं खरं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदारने अचानक एक्झिट घेतली, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता.
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम राज्यात मोठ्या प्रमाणावर पाहिला जातो. या शोमधून नवनवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले, त्यातील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या कार्यक्रमात जुने आणि नवोदित कलाकारांची अनोखी आणि मजेशीर जुगलबंदी पाहायला मिळाली. मात्र अचानक या शोमधील महत्त्वाचा चेहरा असणाऱ्या विशाखा सुभेदारने या कार्यक्रमाला रामराम केला. दरम्यान, विशाखाने हा शो सोडण्याचं खरं कारण आता समोर आलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदारने अचानक एक्झिट घेतली, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता एका मुलाखतीत विशाखाने हास्यजत्रा सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. विशाखा सुभेदार म्हणाली की, “मी अनेक वर्षांपासून 'हास्यजत्रा'मध्ये काम करत होते. साचेबद्ध भूमिका करत असल्याने मला कंटाळा आला होता. मी ज्या प्रकारच्या भूमिका करत होते, लोक त्याच नजरेतून मला पाहू लागले होते. त्यामुळे, पुढे चित्रपटांमधूनही मला त्याच प्रकारच्या भूमिका मिळू लागल्या.”
advertisement
कुटुंबाच्या काळजीमुळे झाली होती व्याकुळ
विशाखाने पुढे सांगितलं की, तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. पण, हा निर्णय घेताना ती थोडी घाबरली होती. कधी कधी तिला वाटायचं की ती काहीतरी चुकीचं पाऊल उचलते आहे. कारण मिळणाऱ्या मानधनावर तिच्या कुटुंबाचा गाडा चालतो. याबद्दल बोलताना ती भावूक झाली.
advertisement
नवरा आणि मुलाचा मिळाला पाठिंबा!
विशाखाने सांगितलं की, हा मोठा निर्णय घेताना तिला तिचा नवरा आणि मुलाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. त्यांच्या प्रोत्साहनमुळेच ती 'हास्यजत्रा' सोडून काहीतरी नवीन करू शकली. ती म्हणाली, “हास्यजत्राने मला खूप काही दिलं आहे. पण काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असल्यानेच मी हा शो सोडला. महिन्याकाठी मिळणारी रक्कम आता मिळणार नाही, याची मला जाणीव होती. पण घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आता निर्मिती क्षेत्रातही काम करू शकले आहे.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Maharashtrachi Hasyajatra : 'काहीतरी चुकीचं...', अखेर विशाखा सुभेदारने सांगितलं महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्याचं खरं कारण