Facebook वर खरंच 3 वेळा लाईक बटण दाबल्याने येतो स्क्रीनशॉर्ट? असा मेसेज का होतोय व्हायरल?

Last Updated:

कुणीतरी सोशल मीडियावर असं सांगायला सुरुवात केली की फेसबुक पोस्टवर तीन वेळा लाईक बटण दाबलं तर आपोआप स्क्रीनशॉट घेतला जाईल. आता प्रश्न असा पडतो की खरंच फेसबुककडे असं काही फीचर आहे का, की ही फक्त आणखी एक अफवा आहे?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सोशल मीडियाच्या दुनियेत असंख्य असे व्हिडीओ व्हायरल होतात. तर काही दावे देखील व्हायरल केले जातात. पण यांपैकी काही खरे असतात तर काही खोटे दावे असतात. लोक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोष्टींवर डोळे बंद करुन विश्वास ठेवतात, ज्यामुळे इथे फसवणूकीचे मेसेज किंवा दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
असाच एक फीचरबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय हे कुणीतरी सोशल मीडियावर असं सांगायला सुरुवात केली की फेसबुक पोस्टवर तीन वेळा लाईक बटण दाबलं तर आपोआप स्क्रीनशॉट घेतला जाईल. आता प्रश्न असा पडतो की खरंच फेसबुककडे असं काही फीचर आहे का, की ही फक्त आणखी एक अफवा आहे?
फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर लोक अशा प्रकारचे पोस्ट्स करत आहेत. “तीन वेळा लाईक करा आणि स्क्रीनशॉट घेतला जाईल” असं सांगून हे फीचर खूप दिवसांपासून व्हायरल होत आहे, ते अशा शैलीत ते मांडलं जातंय. हे पाहून लोकही उत्सुकतेपोटी तीनदा लाईक करून पाहतात आणि पोस्ट्स री-शेअर करतात. थोड्याच वेळात ही एक व्हायरल ट्रेंड बनते. याआधीही “लाईक केल्यावर रंग बदलेल” किंवा “कमेंट केल्यावर गिफ्ट मिळेल” अशा खोट्या दाव्यांनी सोशल मीडियावर गोंधळ घातला होता.
advertisement
खरी वस्तुस्थिती काय आहे?
फेसबुकने असे कोणतेही फीचर जाहीर केलेले नाही. आम्ही फेसबुकच्या पॉलिसीज तपासल्या असता असं दिसलं की, लाईक बटण दाबून स्क्रीनशॉट घेण्यासारखं कोणतंही फंक्शन अस्तित्वात नाही. स्क्रीनशॉट हा डिव्हाइसचा फीचर असतो, तो फोनच्या बटणांच्या किंवा सेटिंग्जच्या मदतीनेच घेतला जातो. फेसबुकसारखे अॅप्स तुमच्या फोनच्या सिस्टम कमांड्सवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे तीन वेळा लाईक बटण दाबून स्क्रीनशॉट घेणं शक्यच नाही.
advertisement
लोक अशा अफवांवर का विश्वास ठेवतात?
सोशल मीडियावर कुठलीही माहिती तपासल्याशिवाय लोक ट्रेंड फॉलो करतात, हे नवीन नाही. तंत्रज्ञानाची अपुरी माहिती, नवीन फीचरबद्दलची उत्सुकता आणि वारंवार दिसणाऱ्या पोस्ट्समुळे लोक अशा गोष्टींवर सहज विश्वास ठेवतात. काही वेळा हे पोस्ट्स फक्त मजाक किंवा ट्रोलिंगसाठीही केले जातात.
आता हे स्पष्ट आहे की फेसबुकवर तीन वेळा लाईक केल्यावर स्क्रीनशॉट घेतला जाण्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. अशा प्रकारचे पोस्ट्स कधी कधी फसवणुकीसाठीही केले जातात. त्यामुळे अशा दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी खात्री करून घ्या आणि मगच ते करुन पाहा किंवा असे मेसेज फॉलो करा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Facebook वर खरंच 3 वेळा लाईक बटण दाबल्याने येतो स्क्रीनशॉर्ट? असा मेसेज का होतोय व्हायरल?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement