Most Watched Series : 8 एपिसोडची 'ही' सीरिज, 517 दिवसांपासून नेटफ्लिक्सवर लोकांची फेव्हरेट; 'क्रिमिनल जस्टिस' पडली मागे

Last Updated:

Most Watched Web Series : एखादी चांगली वेबसीरिज पाहण्याच्या शोधात असाल तर ओटीटीवरील 'ही' सीरिज खास तुमच्यासाठी आहे. जबरदस्त स्टारकास्ट, उत्तम कथानक असलेली ही 8 एपिसोडची सीरिज नक्की पाहा.

News18
News18
Most Watched Web Series : ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या, वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. या सीरिज प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. मनोरंजनासह उत्तम कथानक असणाऱ्या सीरिजच्या शोधात असाल तर 'ही' सीरिज तुमच्यासाठीच आहे. घरबसल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही सीरिज तुमच्या वॉच लिस्टमध्ये नक्की असावी. या सीरिजमध्ये फक्त तगडी स्टारकास्ट नसून कथानकदेखील उत्तम आहे. 'मामला लीगल है' असं या वेबसीरिजचं नाव आहे. 8 एपिसोडची कोर्ट रूम ड्रामा असणारी ही सीरिज नक्कीच पाहायला हवी. या सीरिजमधील रवी किशन ते यशपाल चौधरीपर्यंत अनेक पात्र तुमचं लक्ष वेधून घेतील.
'मामला लीगल है' काय आहे?
'मामला लीगल है' या सीरिजमध्ये दिल्लीच्या पटपड़गंज भागातील जिल्हा न्यायालयाची गोष्ट दाखविण्यात आली आहे. ज्यात अनेक असे विचित्र आणि मनोरंजक खटले येतात की ती ऐकल्यानंतर तुम्हीही तुमचे हसू थांबवू शकणार नाहीत. वकील वीडी त्यागीची भूमिका रवि किशन साकारत आहेत, जो कायदेशीर व्यवस्थेत आपल्या कौशल्याने आणि हुशारीने अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. सीरीजमध्ये दाखवलं आहे की एका खटल्यात तोत्याने महिलेला शिव्या घातल्याचा दावा आहे. त्या दरम्यान वकिलांमध्ये होणारं संभाषणही खूप गुंतागुंतीचं आणि पटत नाही असं आहे.
advertisement
वीडी त्यागी बार असोसिएशनचे अध्यक्ष होण्याची इच्छा बाळगतात. सीरीजमध्ये अनन्या श्रॉफही आहे. अनन्याने नैला ग्रेवालची भूमिका साकारली आहे. नैला हार्वर्डमधून शिक्षण घेऊन आलेली एक तरुण वकील आहे. ती कायदेशीर मदतीपासून वंचित लोकांना मदत करू इच्छिते, पण कोर्टमध्ये पाहिलेल्या व्यवस्थेने तिला मोठा धक्का बसतो.
advertisement
'मामला लीगल है' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा राहुल पांडेने सांभाळली आहे. 1 मार्च 2024 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. रिलीज झाल्यापासून आजही या सीरिजला प्रेक्षकांची तेवढीच प्रशंसा मिळत आहे. 517 दिवसांपासून या सीरिजचा ओटीटीवर कब्जा आहे. आयएमडीबीने या सीरिजला 8.0 रेटिंग दिले आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Most Watched Series : 8 एपिसोडची 'ही' सीरिज, 517 दिवसांपासून नेटफ्लिक्सवर लोकांची फेव्हरेट; 'क्रिमिनल जस्टिस' पडली मागे
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement