शाहिद कपूर-तृप्ती डिमरीवर भडकले नाना पाटेकर, ट्रेलर लाँच अर्ध्यात सोडून निघून गेले, नेमकं झालं काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
O Romeo ट्रेलर लाँचला नाना पाटेकर पोहोचले. पण एका तासातच ते इव्हेंट अर्ध्यात सोडून निघून गेले. नाना इव्हेंटमध्ये नसल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. इव्हेंटमध्ये नेमकं घडलं काय?
अभिनेते नाना पाटेकर नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिले आहेत. नानांचा स्पष्टवक्तेपणा आणि शिस्त याचा पुन्हा एकदा प्रत्येय पाहायला मिळाला. शाहिद कपूरच्या आगामी ‘ओ रोमियो’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलर लाँचसाठी मुंबईत मोठ्या दिमाखात प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होतं. या कार्यक्रमाला दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्यासह संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. मात्र या ट्रेलर लाँचदरम्यान एक अनपेक्षित घटना घडली आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे कार्यक्रम अर्ध्यातच सोडून निघून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर लाँच प्रेस कॉन्फरन्सला तब्बल 1 तास उशीर झाला. या विलंबामुळे नाना पाटेकर नाराज झाले आणि कोणालाही न सांगता ते कार्यक्रमातून उठून निघून गेले. नानांच्या या वागण्यामुळे उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी हे स्टेजवर असतानाच नाना पाटेकर कार्यक्रमातून बाहेर पडले.
advertisement
नाना पाटेकर कार्यक्रमात नसतानाच दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी त्यांच्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. PTI ने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशाल भारद्वाज म्हणतात, "नाना पाटेकर उठून गेले याचं मला वाईट वाटलं नाही. ते असेच आहेत. ते असते तर नक्कीच चांगलं वाटलं असतं पण ते नाहीत."
advertisement
"Nana apne signature style me uthe aur kaha ki mujhe 1 ghanta wait karwaya aur chale gaye. Hume bura nahi laga because we know.. That's what makes #NanaPatekar the Nana Patekar" - #VishalBhardwaj at #ORomeo trailer event pic.twitter.com/9nf8fa3MUR
— $@M (@SAMTHEBESTEST_) January 21, 2026
advertisement
विशाल भारद्वाज पुढे म्हणाले, "नाना म्हणजे शाळेतला तो बदमाश मुलगा. जो सगळ्यांना बुली करायचा. आता सगळ्यात जास्त एंटरटेन करतो आणि ज्याच्यासोबत सगळ्यांना राहावंसं वाटतं. नानांमध्ये हे सगळं आहे."
नाना पाटेकर कार्यक्रमातून का गेले याबाबत बोलकाना विशाल भारद्वाज म्हणाले, "आमची 27 वर्षांची मैत्री आहे आणि हे पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करत आहोत. जर ते कार्यक्रमात थांबले असते तर छान वाटलं असतं. पण त्यांनी त्यांच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये सांगितलं, "1 तास वाट पाहायला लावलं, मी जातो." आम्हाला याचं काहीच वाईट वाटलं नाही कारण हेच नानांना नाना पाटेकर बनवतं."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 9:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शाहिद कपूर-तृप्ती डिमरीवर भडकले नाना पाटेकर, ट्रेलर लाँच अर्ध्यात सोडून निघून गेले, नेमकं झालं काय?










