Video: मराठवाड्यात शूट झालेल्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार; मुंबईनंतर हा जिल्हा ठरणार शूटिंग डेस्टिनेशन?

Last Updated:

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चंद सांसें या शॉर्ट फिल्मची निर्मिती मराठवाड्याती झालीय. पाहा निर्मिती मागची कहाणी..

+
Video:

Video: 'चंद सांसें'ला राष्ट्रीय पुरस्कार, पाहा कशी झाली शॉर्ट फिल्मची निर्मिती

छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट: महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि कोल्हापूर ही मनोरंजन क्षेत्राची प्रमुख केंद्रे म्हणून पुढे आली. मात्र यात मराठवाडा नेहमीच मागास राहिल्याचं दिसलं. याच मराठवाड्याच्या मनोरंजन विश्वासाठी एक अभिमानास्पद घटना नुकतीच घडलीय. नुकताच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. यात मराठवाड्यात निर्मिती झालेल्या 'चंद सांसें' या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा अभिनय असलेल्या या चित्रपटाची कथाही मोठी रंजक आहे.
कशी झाली शॉर्ट फिल्मची निर्मिती?
नुकतेच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून 'चंद सांसें' या शॉर्ट फिल्मला पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं सर्व चित्रीकरण हे मराठवाड्यातील संभाजीनगर येथील एमजीएम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेलं आहे. या शॉर्ट फिल्मची निर्मिती एमजीएम विद्यापीठामधील स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स आणि निर्माते चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेली आहे. तर याचं दिग्दर्शन प्रतिभा जोशी यांनी केलेलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेमध्ये मोहन आगाशे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हे आहेत. तर मिलिंद जोग यांनी हा संपूर्ण चित्रपट चित्रित केलेला आहे.
advertisement
एमजीएम परिसरात झालं शूटिंग
विशेष म्हणजे या सर्व शॉर्ट फिल्मचं शूटिंग एमजीएममधील हॉस्पिटल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये झाले. तर कॉस्च्युम, मेकअप, हेअर हे सर्व इथल्या विद्यार्थ्यांनी स्वतः डिझाईन केलेलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये सर्व कामे येथील विद्यार्थ्यांनीच केलेली आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात चित्रीत झालेल्या एखाद्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार भेटला ही सर्वांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे येथील विद्यार्थी आणि प्राचार्य सांगतात.
advertisement
सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली
चंद सांसें या फिल्मचं आम्ही पहिल्या लॉकडाऊननंतर आणि दुसरे लॉकडाऊन लागायच्या आधीच चित्रीकरण केलं. यातली सर्व कामे आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहेत. याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. आमच्या ध्यानीमनी सुद्धा नसताना या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार भेटल्याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे, असं प्राचार्य शिव कदम सांगतात.
advertisement
आमच्यासाठी अभिमानाची बाब
मी फर्स्ट इयरला असताना मला ही शॉर्ट फिल्म करायला मिळाली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. याच्यामध्ये सर्व मोठे मोठे कलाकार होते. त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि मला यामधून खूप काही शिकायला भेटलं. याला राष्ट्रीय पुरस्कार भेटला ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे विद्यार्थी स्वप्निल सरोदे म्हणतो. तर ही शॉर्ट फिल्म जरी असली तरी याच्यामध्ये आम्ही सर्व पिक्चर फिल्म साठी लागणाऱ्या गोष्टी वापरल्या आहेत. हे चित्रीकरण करत असताना आम्हाला वाटलंही नव्हतं की या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार भेटेल, असं महेश हरबक म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Video: मराठवाड्यात शूट झालेल्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार; मुंबईनंतर हा जिल्हा ठरणार शूटिंग डेस्टिनेशन?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement