आई-वडिलांच्या हट्टापायी लग्न, माझं तिच्यावर प्रेम नाही... लग्नाच्या २६ वर्षांनंतर निरहुआचा खळबळजनक खुलासा!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
निरहुआने पत्नी मंशा यादववर कधीच प्रेम नव्हतं असं सांगितलं, लग्न आईवडिलांच्या हट्टामुळे झालं. मुलांना जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्य देणार असल्याचंही जाहीर केलं.
भोजपुरी चित्रपटसृष्टीचा ज्युबिली स्टार निरहुआ याच्या फिल्मी करिअरपेक्षा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खुलाशानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. निरहुआ पुन्हा एकदा आपल्या गाण्यांमुळे नाही तर वैयक्तीक आयुष्यातील त्याने केलेल्या खुलाशानंतर चर्चेत आला आहे. अभिनेत्री आम्रपाली दुबेसोबतच्या नात्यावरून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या निरहुआने चक्क आपल्या पत्नीबद्दल असं काही विधान केलं आहे, ज्याने सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं.
आई-वडिलांच्या हट्टापायी झालं लग्न?
"माझं पत्नीवर कधीच प्रेम नव्हतं, मी फक्त कर्तव्यापोटी हे नातं निभावतोय," असं निरहुआने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. डिजिटल कॉमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत निरहुआने आपल्या लग्नामागचं सत्य सांगितलं. तो म्हणाला, "माझं लग्न माझ्या आई-वडिलांनी जबरदस्तीने लावून दिलं होतं. मी त्यांना खूप विनवण्या केल्या, मला करियर करायचं आहे, त्यात यश मिळूदे मग त्यानंतर लग्न करेन पण त्यांनी माझं ऐकलं नाही. मला आयुष्यात असा जोडीदार हवा होता ज्याच्यावर मी प्रेम करू शकेन, पण दुर्दैवाने माझ्यासोबत तसं कधीच झालं नाही."
advertisement
पत्नीलाही हे सत्य माहीत आहे
निरहुआ इथेच थांबला नाही, तर त्याने पत्नीलाही हे कटू सत्य माहिती असल्याचं सांगितलं. त्याची पत्नी मंशा यादव हिलाही सांगितलं आहे. "मी माझ्या पत्नीला आणि मुलांनाही स्पष्टपणे सांगितलं आहे की, माझं तिच्यावर कधीच प्रेम नव्हतं. आई-वडिलांनी लग्न लावून दिलं म्हणून मी माझा संसार आणि कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत आहे. पण मनात एक खंत आणि अपराधीपणाची भावना कायम असते," हे बोलताना निरहुआ भावुक झाला होता.
advertisement
मुलांच्या बाबतीत घेणार काळजी
स्वतःच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता राहिली असली, तरी निरहुआने आपल्या मुलांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, "माझ्यासोबत जे घडलं ते मी माझ्या मुलांच्या बाबतीत कधीच होऊ देणार नाही. मी माझ्या मुलांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देईन. मी त्यांच्यावर कधीच माझं मत लादणार नाही."
मंशा यादव ग्लॅमरपासून दूर
निरहुआ आणि मंशा यादव यांच्या लग्नाला २६ वर्ष झाली मात्र इतक्या वर्षांनंतर आता पतीचा हा खुलासा चर्चेचा विषय ठरला आहे. २००० साली त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. निरहुआचं नाव अनेकदा आम्रपाली दुबेसोबत जोडलं गेलं, पण मंशा यादव कधीही मीडियासमोर आल्या नाहीत किंवा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी नेहमी लाईमलाइट आणि प्रसिद्धी झोतापासून चर्चेपासून दूर राहाणं पसंत केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 8:36 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आई-वडिलांच्या हट्टापायी लग्न, माझं तिच्यावर प्रेम नाही... लग्नाच्या २६ वर्षांनंतर निरहुआचा खळबळजनक खुलासा!






