ऑनस्क्रीन माय-लेकाचं खऱ्या आयुष्यात जुळलं, घेतल्या प्रेमाच्या आणाभाका, पण घडलं वेगळंच
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
इंडस्ट्रीतल्या आणखीही काही कलाकारांनी पडद्यावर आई-मुलाची भूमिका निभावली आणि खऱ्या आयुष्यातल्या त्यांच्या प्रेमाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या.
अभिनयक्षेत्रात सहकलाकारांसोबत मिळालेली प्रत्येक भूमिका उत्तम करावी लागते. काही वेळा एकमेकांच्या वयातलं अंतरही जाणवू न देण्याचं कसब कलाकारांना करावं लागतं. ‘मदर इंडिया’ चित्रपटातली नर्गीस आणि सुनील दत्त यांची आई-मुलाची भूमिका हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. चित्रपटात आई-मुलाच्या प्रेमळ नात्यात बांधलेले हे कलाकार प्रत्यक्ष जीवनात मात्र एकमेकांचे जोडीदार होते. इंडस्ट्रीतल्या आणखीही काही कलाकारांनी पडद्यावर आई-मुलाची भूमिका निभावली आणि खऱ्या आयुष्यातल्या त्यांच्या प्रेमाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या.
बेगुसराय मालिकेत श्वेता तिवारीनं विशाल आदित्य सिंहच्या आईची भूमिका केली होती; मात्र अलीकडेच त्या दोघांच्या मॉर्फ केलेल्या फोटोंमुळे त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी ते नाकारलं असलं, तरी इंडस्ट्रीमध्ये आई-मुलाची भूमिका केलेले आणि खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडलेले असे आणखीही काही कलाकार आहेत.
नर्गीस-सुनील दत्त
हिंदी चित्रपटसृष्टीतले हे दोघंही मान्यवर कलाकार आहेत. अत्यंत गाजलेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात नर्गीस यांनी सुनील दत्त यांच्या आईची भूमिका केली होती. हा चित्रपट 1957 साली प्रदर्शित झाला होता. त्याच चित्रपटाच्या सेटवर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1958मध्ये त्यांनी लग्नदेखील केलं.
advertisement
रेहाना पंडित-झीशान खान
कुमकुम भाग्य या मालिकेतून लोकप्रिय झालेले रेहाना पंडित आणि झीशान खान सध्या एकमेकांच्या प्रेमात आहेत. याच मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. त्यात झीशानच्या आईची भूमिका रेहानानं साकारली होती. त्यांनी 2021मध्ये अधिकृतपणे त्यांचं नातं स्वीकारलं होतं.
advertisement
अनुष्का शेट्टी-प्रभास
बाहुबली चित्रपटानं प्रभासला मोठं यश मिळालं. 2015 साली आलेल्या या चित्रपटानंतर या चित्रपटात प्रभासबरोबर झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या आणि प्रभासच्या प्रेमाची चर्चा रंगली. चित्रपटात अनुष्कानं प्रभासच्या आईची भूमिका केली होती. त्या दोघांनी मात्र त्यांच्या नात्याबाबत कायमच नकार दिला. एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं त्यांनी वेळोवेळी म्हटलं आहे.
किश्वर मर्चंट-सुयश राय
advertisement
‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेच्या सेटवर किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांची ओळख झाली होती. ही मालिका 2010मध्ये आली होती. मालिकेत आई-मुलाची भूमिका साकारणारे किश्वर आणि सुयश हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी 2016 साली लग्न केलं.
मोनिका सिंह-अंकित गेरा
मोनिका सिंह आणि अंकित गेरा यांचं नाव या यादीत आवर्जून घ्यावं लागेल. ‘मन की आवाज-प्रतिज्ञा’ या 2009मध्ये आलेल्या मालिकेत मोनिका सिंह नायिका होती. त्या मालिकेत मोनिकानं अंकित गेराच्या आईची भूमिका साकारली होती. त्या मालिकेच्या शूटिंगदरम्यानच त्यांच्या डेटिंगबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ते लग्न करतील असं चाहत्यांना वाटत होतं; मात्र कुटुंबीयांच्या नाराजीमुळे अंकितनं ते नातं संपवलं.
advertisement
बॉलिवूडमध्ये एकत्र काम करताना आई-मुलाची भूमिका करणाऱ्या काही कलाकारांनी प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी नातं जोडलं, तर काहींच्या नात्यांच्या केवळ चर्चा रंगल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2024 10:48 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ऑनस्क्रीन माय-लेकाचं खऱ्या आयुष्यात जुळलं, घेतल्या प्रेमाच्या आणाभाका, पण घडलं वेगळंच