Pushpa 2 मधलं 'किस्सीक' गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग, पण नावाचा अर्थ काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Pushpa 2 Kissik Song Meaning: २४ नोव्हेंबरला ‘पुष्पा २ द रूल’ मधील आयटम साँग सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. ‘किस्सीक’ असे या गाण्याचे नाव असून या गाण्यात अल्लू अर्जुन आणि श्रीलीला आहेत.
साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २ द रूल’ या चित्रपटाची तुफान क्रेझ पाहायला मिळतेय. ५ डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये धडकणार आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राईज’ने जगभरात जवळपास ३७० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग काय जादू करणार आहे हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर आज म्हणजेच २५ नोव्हेंबरला चेन्नईमध्ये निर्मात्यांनी एका ग्रँड म्युझिक इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. २४ नोव्हेंबरला हे आयटम साँग सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. ‘किस्सीक’ असे या गाण्याचे नाव असून या गाण्यात अल्लू अर्जुन आणि श्रीलीला आहेत.
दरम्यान, म्युझिक लाँच इव्हेंटमध्ये ‘किस्सीक’ या गाण्याचा अर्थ सांगण्यात आला. त्यानुसार याचा अर्थ आहे ‘फोटो घ्या’. गाण्याच्या सुरुवातीला अल्लू अर्जुन म्हणतो, “आ गए ना सब पार्टी में. अब खींच रे फोटो किसिक करके.” फोन किंवा कॅमेरामध्ये फोटो क्लिक केल्यावर ‘किस्सीक’ असा आवाज येतो, तेच या गाण्याचे शीर्षक आहे.
advertisement
सध्या हे गाणे लिरिकल व्हर्जनमध्ये रिलीज झाले आहे. तथापि, व्हिडिओच्या शेवटी त्यात बीटीएस व्हिडिओची झलक दाखवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात ‘पुष्पा- पुष्पा- पुष्पा’ आणि ‘सोसेकी’ अशी दोन गाणी सोशल मीडियावर रिलीज झाली आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला.
advertisement
‘पुष्पा २’ चित्रपट येत्या ५ नोव्हेंबर २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2024 7:06 PM IST