OTT Weekend Watch: अ‍ॅक्शन, थ्रिलर, अ‍ॅनिमेशनचा धमाका; 'या' वीकेंडला ओटीटीवर पाहा हे जबरदस्त मूव्ही-सीरीज

Last Updated:

OTT Weekend Watch: बॉक्स ऑफिसवर काही चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकत नाहीत, पण ओटीटीवर येताच त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळते.

वीकेंडला ओटीटीवर पाहा हे जबरदस्त मूव्ही
वीकेंडला ओटीटीवर पाहा हे जबरदस्त मूव्ही
मुंबई : बॉक्स ऑफिसवर काही चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकत नाहीत, पण ओटीटीवर येताच त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळते. दर आठवड्याला काही नवीन चित्रपट किंवा सीरीजची ओटीटीवर एंट्री होते आणि प्रेक्षकांचे मनोरंजन वाढवते. या आठवड्याचा प्लॅन तुम्ही केला नसेल तर तुमच्यासाठी घरबसल्या पाहण्यासाठी मोठी लिस्ट आहे. तुमच्या आवडीचा सिनेमा-सीरीज तुम्ही सिलेक्ट करून पाहू शकता.
War 2
हा चित्रपट 9 ऑक्टोबर 2025 पासून Netflix वर स्ट्रीम झाला. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि जूनियर एनटीआर प्रमुख भूमिकेत आहेत. थिएटरमध्ये अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत, परंतु आता प्रेक्षकांना घरबसल्या स्ट्रीम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही या सिनेमाचा घरबसल्या आनंद घेऊ शकता.
advertisement
Jamnapaar – Season 2
'जमुनापार' सीरीजचा दुसरा सिझन 10 ऑक्टोबर रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित झाला. या सिझनमध्ये ऋत्विक साहोरे, वरुण बडोला, अंकिता सहगल, सृष्टी गांगुली रिंदानी, अनुभा फतेहपुरिया, ध्रुव सहगल, इंदर साहनी आदी कलाकार आहेत.
Search: The Naina Murder Case
ही थ्रिलर मालिका 10 ऑक्टोबर रोजी Jio Hotstar वर प्रदर्शित झाली आहे. अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा यांची मुख्य भूमिका आहे. सीरीजचे दिग्दर्शन रोहन सिप्पी यांनी केले आहे.
advertisement
Kurukshetra: The Great War of Mahabharata
ही ॲनिमेटेड मालिका 10 ऑक्टोबर 2025 पासून Netflix वर उपलब्ध झाली. महाभारतातील महायुद्धाच्या कथानकावर आधारित असून, अनेक योद्ध्यांची कथा आणि संघर्षाची मांडणी यात असेल.
The Woman in Cabin 10
जर तुम्हाला रहस्यमय थ्रिलर आवडत असेल, तर 10 ऑक्टोबर रोजी Netflix वर “The Woman in Cabin 10” प्रदर्शित झाली. तुम्ही याचाही तुमच्या वीकेंड वॉच लिस्टमध्ये समावेश करू शकता.
advertisement
Mirai
“मिराई” नावाचा चित्रपट आता Jio Hotstar वर 10 ऑक्टोबर पासून उपलब्ध झाला आहे. या चित्रपटात तेजा सज्जा आणि मंचू मनोज हे कलाकार आहेत.
दरम्यान, या आठवड्यात विविध प्रकारच्या शैलीतील ॲक्शन, थ्रिलर, ॲनिमेशन कंटेंट येत आहे त्यामुळे प्रेक्षकांना निवडीची विस्तीर्ण संधी आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Weekend Watch: अ‍ॅक्शन, थ्रिलर, अ‍ॅनिमेशनचा धमाका; 'या' वीकेंडला ओटीटीवर पाहा हे जबरदस्त मूव्ही-सीरीज
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement