advertisement

प्राजक्ताने घरी आणली नवी कोरी आलिशान कार, Video शेअर करत म्हणाली 'आई शप्पथ! लई भारी...'

Last Updated:

प्राजक्ताने नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

News18
News18
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात सध्या 'गुड न्यूज'ची लाटच आली आहे! अनेक कलाकार त्यांची अनेक वर्षांपासूनची स्वप्नं प्रत्यक्षात उतरवत आहेत. कुणी स्वतःचं हक्काचं घर घेतलं, तर कुणी नवी कोरी गाडी! नवीन गाडी खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं, आणि आता हे स्वप्न अभिनेत्री प्राजक्ता नवनाळेनेही पूर्ण केलं आहे. अशातच जान्हवी किल्लेकर, संजय नार्वेकर, गौरव मोरे, हेमल इंगळे यांसारख्या कलाकारांची यादीही तिचंही नाव जोडलं गेलं आहे.

प्राजक्ता नवनाळेच्या गॅरेजमध्ये आलिशान गाडी दाखल!

'येड लागलं प्रेमाचं' या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे हिने नुकतीच एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. या नव्या गाडीचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर करताच, तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे कामाचे अपडेट्स असो किंवा व्यायामाचे व्हिडिओ, चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या या नव्या व्हिडिओनेही चाहत्यांना खूप आनंद दिला आहे.
advertisement
व्हिडिओमध्ये प्राजक्ता तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत नवीन गाडी घेण्यासाठी शोरूममध्ये गेली होती. गाडीची कागदपत्रं पूर्ण करण्यापासून ते तिची पूजा करण्यापर्यंतचे क्षण तिने या व्हिडिओमध्ये कैद केले आहेत. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि आनंद दिसत होता. तिच्या डोळ्यांतून स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
advertisement

"देवा तुझे आभार..." - प्राजक्ताची भावनिक पोस्ट

या स्वप्नवत क्षणांचा व्हिडिओ शेअर करताना प्राजक्ताने एक खूपच हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिलं आहे. ती म्हणते, "गणपती बाप्पा मोरया... आई शप्पथ! स्वतःच्या डोळ्यांनी स्वप्न पूर्ण होताना बघण्याची मजाच वेगळी असते. देवा तुझे आभार. सुदैव माझ्या पाठीशी राहा. हे यश मिळवून देण्यासाठी मी तुझे आभार मानते." तिच्या या प्रामाणिक भावनांवर नेटकऱ्यांनीही भरभरून कमेंट्स केल्या आहेत आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
advertisement
advertisement
प्राजक्ताने तिच्या मेहनतीने आणि चिकाटीने हे यश मिळवलं आहे, याबद्दल तिचे चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत. तिच्या या प्रवासात कुटुंबाचाही मोठा वाटा होता, हे तिने व्हिडिओतून दाखवून दिलं आहे. प्राजक्ताच्या या स्वप्नपूर्तीच्या क्षणात तिचे चाहतेही तिच्यासोबत आनंदी झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्राजक्ताने घरी आणली नवी कोरी आलिशान कार, Video शेअर करत म्हणाली 'आई शप्पथ! लई भारी...'
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement