प्राजक्ता गायकवाडचं झालं, माळीचं लग्न कधी? अभिनेत्रीला कसा हवाय नवरा; म्हणाली, 'मी फ्रंट सीटवर तो...'

Last Updated:

Prajakta Mali Marriage : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा नुकताच साखरपुडा झाला. आता अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी लग्न करणार? प्राजक्ताला कसा हवाय मुलगा?

News18
News18
मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या दोन प्राजक्ता चर्चेत आहेत. एक प्राजक्ता गायकवाड आणि दुसरी प्राजक्ता माळी. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून येसूबाई म्हणून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री प्राजक्ता गाडकवाडनं नुकताच साखरपुडा केला. प्राजक्ता गायकवाडला तिच्या खऱ्या आयुष्यातील शंभुराज भेटला. प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनातही अडकणार आहे. दरम्यान आता अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. प्राजक्ता माळी आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्राजक्ता माळी तिच्या बर्थडेमुळे आणि प्राजक्ता गायकवाड तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता गायकवाडचं झालं आणि प्राजक्ता माळी कधी लग्न करणार? काय आहे प्राजक्ताचं लग्नाविषयी मत? कसा हवाय प्राजक्ताला जोडीदार?
प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. काही दिवसांआधी प्राजक्ताला एका शेतकऱ्यानं लग्नाची मागणी घातली होती. ज्याचं प्राजक्तानं कौतुक केलं होतं. पण प्राजक्ताला कोणाशी लग्न करायचं आहे.
advertisement
राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं तिच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, "मी लग्न करावं यासाठी माझी आई हात धुवून माझ्या मागे लागली आहे. मी तिला इतके दिवस फुलवंती झाल्यानंतर... फुलवंती झाल्यानंतर...फुलवंती झाल्यानंतर असं सांगत होती. आता फुलवंती झाल्यानंतर तिचं पुन्हा सुरू झालंय. त्यामुळे मला भिती वाटत आहे."
advertisement
लग्नाविषयी प्राजक्ता म्हणाली होती, "मी एके ठिकाणी वाचलं होतं की, तीन गोष्टींमुळे कोणतेही निर्णय होतात. एक जे आपोआपच होतात. माझं इंडस्ट्रीत येणं आपोआपच ठरलं. कोणी ते ठरवलं नव्हतं. दुसरं म्हणजे मुद्दामून घेतलेला निर्णय. फुलवंती करायचा हा निर्णय माझा होता. तिसरं म्हणजे तिसरा व्यक्ती आपल्यासाठी निर्णय घेतो. आई-वडील आपल्या डोक्यावर बसतात आणि आपल्याकडून ते करवून घेतात. पहिल्या दोन कॅटेगिरीत माझं लग्न होणार नाही. युनिव्हर्सलाच मी सिंगल राहायला हवं आहे. मी पण लग्नाच्या झोनमध्ये नाही. पण माझ्या आईची इच्छा आहे की मी लग्न करावं."
advertisement
advertisement
प्राजक्ता पुढे म्हणाली, "आमच्या इंडस्ट्रीत ते खूप कठीण आहे. तुम्हाला पैसा, प्रसिद्धी मिळेल पण प्रेम मिळणार नाही. सगळंच देव कसं देईल हे मी स्वीकारलं आहे. तो एक प्रकारचा त्याग आहे. पुढे माझं लग्न झालं नाही झालं तरी मी कौटुंबिक आयु्ष्याला प्राधान्य देऊ शकत नाही. मी फ्रंट सीट आणि नवरा बॅक सीटवर असं पाहिजे आता माझे हे विचार कोणी समजू शकला तर... आणि तो माझ्या आयुष्यात आपोआपच आला तर तेव्हा मी निर्णय घेईन. पण त्याला शोधण्याचे प्रयत्न मी करणार नाही."
advertisement
advertisement
मध्यंतरी आम्ही असं ऐकलंय या शोमध्ये बोलताना प्राजक्ता म्हणाली होती, "मी आता घरच्यांना रिस्ट्रीक्ट नाही केलंय. आधी मी म्हणायचे, तुम्ही नका डोकेदुखी करु, माझ्या डोक्याला शॉट नका देऊ. पण मी आता म्हटलं ओके, गो विथ द फ्लो."
प्राजक्ता पुढे म्हणाली, "आईला मी आता फायनली परवानगी दिली आहे की, तू माझ्यासाठी मुलगा शोध. मी असं उडतं उडतं कुठेतरी बोलले होते आणि आईला खरंच दोन पत्र आलीत. त्यातलं एक तर मला खूपच आवडलं. त्यामध्ये त्याने अतिशय प्रांजळपणे असं म्हटलंय की, मी शेतकरी आहे. मला माहितीय हे काहीतरी खूपच वेगळं बोलतोय. तुमचं प्रोफेशन वेगळं आहे. पण मला हे प्रांजळपणे मांडायचंय की मी शेतकी आहे आणि मी शेतीच करणार तुम्हाला आवडणार असेल तर मला करायचंय लग्न. मला ते खूप आवडलं, मी म्हटलं किती गोड आहे हे."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्राजक्ता गायकवाडचं झालं, माळीचं लग्न कधी? अभिनेत्रीला कसा हवाय नवरा; म्हणाली, 'मी फ्रंट सीटवर तो...'
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement