Prajakta Mali : प्राजक्ता माळीला पाहताच चाहता विसरला भान, लिफ्टमध्ये घडलं असं काही, पाहा VIDEO

Last Updated:

Prajakta Mali Video : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्राजक्ताच्या एका चाहत्याने तिच्याबरोबर काय केलं पाहा.

News18
News18
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी इंडस्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फक्त अभिनय नाही तर प्राजक्ता उत्तम डान्सर आणि बिझनेस वुमन आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. या शोने प्राजक्ताला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. प्राजक्ताची फॅन फॉलोविंग अफाट आहे. फक्त सोशल मीडियावर नाही तर प्रत्यक्षातही प्राजक्ताची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात प्राजक्ताबरोबर एक फोटो घेण्यासाठी एका फॅनने जे काही केलंय ते पाहून प्राजक्ताच्या फॅन फॉलोविंगचा आणि तिच्या प्रसिद्धीचा अंदाज येईल.
प्राजक्ता माळी नुकतीच 'ये रे ये रे पैसा 3' या मराठी सिनेमाच्या प्रीमियरला पोहोचली होती. प्रीमियरला जाताना प्राजक्ताबरोबर एक किस्सा घडला. प्रीमियरच्या ठिकाणी तिला एक फॅन भेटला. प्राजक्ताची ही फॅन मुमेन्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
advertisement
एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एका चाहत्याला प्राजक्ताबरोबर फोटो हवा आहे. फोटोसाठी तो प्राजक्ताच्या मागून लिफ्टपर्यंत येतो. प्राजक्ता लिफ्टमध्ये जाते. पण हा बाहेरून लिफ्ट थांबवतो. माझा फोटो काढा सांगतो. इतकंच नाही तर प्राजक्ताला थांबवण्यासाठी तो लिफ्टच्या सेन्सरमध्ये उभा राहिला. प्राजक्ताबरोबर फोटो घेतला आणि मगच तिथून बाहेर पडला.
तर दुसरीकडे प्राजक्ताच्या संयमाचं कौतुक होतंय. फोटोसाठी फॅनची सुरू असलेली धडपड प्राजक्ताने समजून घेतली. फॅनने लिफ्ट थांबवताच प्राजक्ता त्याला शांतपणे म्हणाते, समोर बघा, समोर बघा.
advertisement
advertisement
प्राजक्ता माळीची ही फॅन मुमेन्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्याच्यावर लाफ्ट इमोजी शेअर करत कमेंट्स केल्या आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, प्राजक्ताचा फुलवंती हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमा मराठी फिल्म फेअर अवॉर्डही मिळालं. तिचे आणखी काही नवीन प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali : प्राजक्ता माळीला पाहताच चाहता विसरला भान, लिफ्टमध्ये घडलं असं काही, पाहा VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement