Prajakta Mali: पुण्यातील येरवडा जेलमध्ये पोहोचली प्राजक्ता माळी, कैद्यांच्या चेहऱ्यावर आणलं हसू; VIDEO होतोय व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prajakta Mali: प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री, नृत्यांगना आणि निर्माती आहे. प्राजक्ता तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते.
मुंबई : प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री, नृत्यांगना आणि निर्माती आहे. प्राजक्ता तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यामध्ये ती कारागृहात गेली आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्राजक्ता माळीने पुण्यातील येरवडा महिला कारागृहातील महिलांना भेट दिली. या भेटीचा आनंद तिने या व्हिडीओमधून शेअर केला आहे. तिने श्री श्री रविशंकरजी यांच्या शिकवणीचा उपयोग करत कारागृहातील महिलांचं ध्यान साधना सत्र घेतलं.
व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं, सदिच्छा भेट..! पुणे - महिला कारागृह सुधारणा, पुनर्वसन. सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे कोणाचीतरी मनःस्थिती उंचावणे. श्री श्री रविशंकरजी, मीही माझ्या लहानशा क्षमतेत तेच करण्याचा प्रयत्न करत एक छोटसं ध्यान सत्र घेतलं. गुरुदेव म्हणतात, आपल्याला कधी कधी रुग्णालये, कारागृह, शेती या ठिकाणी जावं, ज्यामुळे आपल्याला आठवते की आपले आयुष्य किती कृतज्ञतेने भरलेले आहे. अतिशय खरे. संधी दिल्याबद्दल ‘माहेर महिलागृहा’चे आभार.”
advertisement
advertisement
दरम्यान, प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर भरपूर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव पहायला मिळत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali: पुण्यातील येरवडा जेलमध्ये पोहोचली प्राजक्ता माळी, कैद्यांच्या चेहऱ्यावर आणलं हसू; VIDEO होतोय व्हायरल


