advertisement

अभिनेते प्रकाश राज यांना मोठा धक्का! अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन, शेवटच्या क्षणी कुटुंबीयांनाही विसरली

Last Updated:

अभिनेते प्रकाश राज यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी ही माहिती दिली.

News18
News18
मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. ती व्यक्ती म्हणजे त्यांची आई सुवर्णलता. 29  मार्च रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 86 वर्षांच्या होत्या. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुवर्णलता अनेक आरोग्याशी संबंधीत काही आजाराने त्रस्त होत्या ज्याबद्दल प्रकाश राज यांनी अनेकदा सांगितले होते.  त्यांच्या आईच्या मेंदूत गाठी झाल्या होत्या. ज्यावर सर्जरी करण्यात आली होती.
प्रकाश राज यांनी सांगितले की, मेंदूतील गाठीच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आईची स्मरणशक्ती कमी झाली होती आणि त्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाही ओळखू शकत नव्हत्या. प्रकाश राज यांच्या आईच्या निधनाची बातमी कळताच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला.
advertisement
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, "प्रसिद्ध अभिनेते श्री प्रकाश राज यांच्या आई, श्रीमती सुवर्णलता गारू यांचे निधन झाल्याचे कळल्याने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो. मी श्री प्रकाश राज गारू आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो."
advertisement
कर्नाटकात जन्मलेल्या सुवर्णलता यांना लहानपणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एका ख्रिश्चन कुटुंबात अनाथ म्हणून जन्मलेल्या सुवर्णलता यांनी तरुणपणी एका रुग्णालयात नर्स म्हणून काम केलं होतं. तिथेच त्यांची भेट त्यांच्या पतीशी झाली. त्यावेळी ते रुग्णालयात रुग्ण होते. ते मित्र बनले आणि नंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. त्यानंतर त्यांनी संसार थाटला. त्यांना तीन मुले आहेत. सर्वात मोठा मुलगा प्रकाश राज, त्यानंतर एक मुलगी आणि एक मुलगा.
advertisement
प्रकाश राज यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांचा अलीकडेच ते 'दे कॉल हिम ओजी' आणि 'देवरा: पार्ट 1' मध्ये दिसले होते. ते 'दृश्यम 3' वर सुद्धा काम करत आहे.  "या अप्रतिम फ्रँचायझी, 'दृश्यम 3' चे हिंदी चित्रीकरण सुरू झाले आहे. एका उत्तम टीमसोबत आणि शानदार कलाकारांसोबत. मला खात्री आहे की तुम्हाला ते आवडेल. (आणि हो, मी कोणाचीही जागा घेत नाहीये...)", असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अभिनेते प्रकाश राज यांना मोठा धक्का! अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन, शेवटच्या क्षणी कुटुंबीयांनाही विसरली
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement