पिक्चरची स्टोरी सांगत होता, एकाने रोखलं दुसऱ्याने धू धू धुतलं; पुण्याच्या थिएटरमध्ये तुफान राडा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pune News : पुण्याच्या एका थिएटरमध्ये सिनेमा सुरू असताना एका तरुणांने एका कुटुंबातील सगळ्या सदस्यांना बेदम मारहाण केली.
मुंबई : थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेल्यावर तरुणांचा धिंंगाणा हा काही नवा नाही. आपल्या आवडता हिरो किंवा हिरोईन स्क्रिनवर आल्यानंतर अनेकदा प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. शाहरुख, सलमान, रजनीकांत, प्रभास, अल्लू अर्जुन सारख्या कलाकारांच्या सिनेमांवेळी असे प्रकार सर्सास होताना दिसतात. पण पुण्यात एक भलताच प्रकार घडला आहे. पुण्याच्या एका थिएटरमध्ये सिनेमा सुरू असताना एका तरुणांने एका कुटुंबातील सगळ्या सदस्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. थिएटरमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत होता. त्यावेळी त्याच्या मागील सीटवर बसलेल्या एका दाम्पत्याने सिनेमाची स्टोरी सांगणे आणि गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यामुळे तरुणाने त्यांना 'स्टोरी आधी सांगू नका' आणि 'शांत बसा' अशी विनंती केली. यामुळे संतापलेल्या आरोपीने तात्काळ तरुणाची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि जमिनीवर पाडले.
advertisement
पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारलं. यात तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर पीडित तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
अकिब जावेद निसार पटेल, व एक महिला यांच्या विरोधात चिंचवड पोलिसांत भारतीय न्याय संहिता 117 , 115, 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पिक्चरची स्टोरी सांगत होता, एकाने रोखलं दुसऱ्याने धू धू धुतलं; पुण्याच्या थिएटरमध्ये तुफान राडा