Shruti Marathe: पुणे विसर्जन मिरवणुकीत हिरमोड, श्रृती मराठेने शेअर केला खेदजनक अनुभव

Last Updated:

Shruti Marathe:गणेशोत्सवाची दहा दिवसांची धामधूम संपली. बाप्पाला निरोप देताना प्रत्येक जण उत्साहात असतो. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर हा जणू आत्माच असतो.

श्रृती मराठेने शेअर केला खेदजनक अनुभव
श्रृती मराठेने शेअर केला खेदजनक अनुभव
मुंबई : गणेशोत्सवाची दहा दिवसांची धामधूम संपली. बाप्पाला निरोप देताना प्रत्येक जण उत्साहात असतो. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर हा जणू आत्माच असतो. या गजरात जेव्हा मराठी मालिकांमधले आणि चित्रपटांमधले कलाकार सहभागी होतात, तेव्हा तो क्षण प्रेक्षकांसाठी खास ठरतो. कलावंत ढोल ताशा पथक हे असंच एक पथक. पण यंदा या पथकाला एक निराशाजनक अनुभव आला.
नेमकं काय घडलं?
मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने कलावंत ढोल ताशा पथकाला विसर्जन मिरवणुकीसाठी बोलावलं होतं. संध्याकाळी 6 वाजता पथक ठरलेल्या जागी पोहोचलं. कलाकारांनी वेशभूषा केली होती, ढोल-ताशा सज्ज होते. पण मिरवणुकीचा वेग इतका कमी होता की टिळक रोडवर ती पुढेच सरकली नाही. तब्बल तीन तास थांबूनही परिस्थिती बदलली नाही.
advertisement
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत तासन्‌तास वाट पाहूनही वादन करण्याची संधी न मिळाल्यामुळे कलावंत ढोल ताशा पथकाला मोठा धक्का बसला. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश असलेलं हे पथक नेहमीच प्रेक्षकांचं खास आकर्षण ठरतं. मात्र यंदा संपूर्ण तयारी करूनही त्यांना आपली कला सादर करता आली नाही.
शेवटी रात्री 9 वाजता पथकाने एक गजर करून, ध्वजवंदन करत वादन थांबवण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांची गर्दी त्यांना पाहण्यासाठी जमली होती, पण त्यांचा हिरमोड झाला. पथकाच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांनी चाहत्यांची माफी मागितली. "पुढच्या उत्सवात नक्की भेटूया," असा दिलासा दिला. श्रुती मराठेने तिच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली.
advertisement
shruti marathe
shruti marathe
या पथकात श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले असे अनेक कलाकार आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. मात्र यावेळी सर्वांचाच हिरमोड झाला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shruti Marathe: पुणे विसर्जन मिरवणुकीत हिरमोड, श्रृती मराठेने शेअर केला खेदजनक अनुभव
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement