Raper Badshah: चेहऱ्यावर सूज, डोळ्यांवर पट्टी, रॅपर बादशाहला झालं तरी काय? PHOTO पाहून चाहते चिंतेत
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Raper Badshah: बॉलीवूडमधील लोकप्रिय रॅपर आणि गायक बादशाह सध्या त्याच्या आरोग्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर नुकतेच दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मुंबई : बॉलीवूडमधील लोकप्रिय रॅपर आणि गायक बादशाह सध्या त्याच्या आरोग्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर नुकतेच दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. बादशाहचा अपघात झाल्याचं फोटोंवरून दिसून येतंय, ज्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आले आहेत.
फोटोंमध्ये बादशाहचा डोळा सुजलेला दिसतो, तर एका फोटोत तो डोळ्यावर पट्टी बांधलेला आहे. चाहत्यांना काळजी वाटावी असे हे फोटो असले तरी बादशाहने कॅप्शनमध्ये विनोदी अंदाज ठेवला. त्याने लिहिले, "अवतार जीचे पंच हिट्स लाईक…" आणि त्यासोबत 'बॉलिवूड बॅडस', 'कोकाना' असे हॅशटॅग टाकले. यावरून चाहत्यांनी अंदाज लावला की हे त्याच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनचा भाग असू शकतो.
advertisement
अलीकडेच आलेल्या आर्यन खानच्या नेटफ्लिक्स मालिकेचा बादशाहने अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे. त्या मालिकेतल्या अवतार सिंग या पात्राद्वारे बादशाहच्या संगीतावर टोलाही लगावला गेला होता. मालिकेतील तो प्रसंग आणि बादशाहचे हे फोटो यांची तुलना अनेकांनी केली.
advertisement
फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया भरभरून आल्या. कुणी “लवकर बरे व्हा” असं म्हणालं, तर कुणी थट्टेत विचारलं, “भाऊ, तुला कोणी मारलं?” सध्या चाहत्यांमध्ये एकीकडे बादशाहच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे या पोस्टचा त्याच्या आगामी सप्टेंबर 2025 मधील गाण्याच्या प्रमोशनशी काही संबंध आहे का, याविषयीही चर्चेला उधाण आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 1:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Raper Badshah: चेहऱ्यावर सूज, डोळ्यांवर पट्टी, रॅपर बादशाहला झालं तरी काय? PHOTO पाहून चाहते चिंतेत