थरार! आधी पत्नीचा गळा चिरला, मग फेसबुक लाईव्हवर येऊन म्हणाला, 'मीच तिला मारलं'... पण का?

Last Updated:

Crime News : एका पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून इसहाक नावाच्या पतीने पत्नी शालिनीचा... 

Crime News
Crime News
कोल्लम, केरळ : केरळच्या कोल्लम जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला आणि त्यानंतर शांतपणे फेसबुकवर लाईव्ह येत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नाही, तर तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अशी घडली थरारक घटना
ही घटना कोल्लम जिल्ह्यातील पुनालुरजवळ घडली. येथील रहिवासी इसहाक आणि त्याची पत्नी शालिनी यांच्यात गेल्या अनेक काळापासून वाद सुरू होते. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शालिनी नेहमीप्रमाणे घराजवळील पाइपलाइनजवळ अंघोळीसाठी गेली. तेव्हाच दबा धरून बसलेल्या इसहाकने धारदार चाकूने तिच्यावर हल्ला केला. शालिनीवर त्याने गळ्यावर, छातीवर आणि पाठीवर सपासप वार केले. ती वेदनेने किंचाळत होती, पण तिला वाचवण्याची संधी कोणालाच मिळाली नाही. काही क्षणांतच त्याने तिचा गळा चिरला आणि शालिनी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली.
advertisement
खून करून फेसबुक लाईव्ह
पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली असताना, इसहाकने थंड डोक्याने मोबाईल काढला आणि फेसबुक लाईव्ह सुरू केले. त्याने कॅमेऱ्यासमोर आपणच पत्नीला संपवल्याचे सांगितले आणि तिच्यावर दागिने हडपल्याचा व बेवफाईचा आरोप केला. यानंतर तो थेट पुनालुर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि म्हणाला, "मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे." त्याचे हे शब्द ऐकून पोलीसही चक्रावून गेले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना शालिनीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी इसहाकला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
थरार! आधी पत्नीचा गळा चिरला, मग फेसबुक लाईव्हवर येऊन म्हणाला, 'मीच तिला मारलं'... पण का?
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement