Pune Crime : पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई! खिसे भरणाऱ्या चार जणांना अटक! पाहा कोण?

Last Updated:

Pune Crime News : आंदेकर टोळी मासळी बाजारातील प्रत्येक विक्रेत्याकडून दरमहा 15 ते 20 हजार रुपये हप्ता वसूल करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

News18
News18
Pune Crime News : पुण्यातील गँगवॉर संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असल्याचं पहायला मिळत आहे. आंदेकरविरुद्ध कोमकर यांच्यातील संघर्षामुळे पुणे हादरलं होतं. अशातच आख्खं आंदेकर कुटूंब तुरूंगात असून कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह 11 जणांविरोधात मासे विक्रेत्यांकडून गेल्या 12 वर्षांत 20 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा गंभीर गुन्हा नुकताच फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. अशातच आता मोठी माहिती समोर आली आहे.

खंडणी प्रकरणात चौघांना अटक

खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांनी शेखर दत्तात्रय अंकुश, मनीष वर्धेकर, सागर बाळकृष्ण थोपटे आणि रोहित सुधाकर बहादूरकर यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आंदेकर टोळीतील वनराज आंदेकरची पत्नी सोनालीलाही आरोपी करण्यात आले आहे. आंदेकर टोळी मासळी बाजारातील प्रत्येक विक्रेत्याकडून दरमहा 15 ते 20 हजार रुपये हप्ता वसूल करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खंडणीच्या पैशावर आंदेकर टोळीने घर आणि संपत्ती जमवल्याचा आरोप आहे.
advertisement

कोणत्या मार्गाने 'माया' जमवली?

कुख्यात आंदेकर टोळीच्या आर्थिक स्रोतांची शहानिशा करण्यासाठी पुणे पोलिस आता थेट प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधणार आहेत. या टोळीने नेमक्या कोणत्या मार्गाने 'माया' जमवली, त्यांचे मालमत्तेशी संबंधित किती व्यवहार वैध आहेत आणि किती 'काळ्या पैशांतून उभे राहिले, याचा मागोवा घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाला पत्र पाठविले जाणार आहे.
advertisement

आर्थिक मुळावर घाव

दरम्यान, आता पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. आंदेकर टोळीवर अनेक गुन्हे दाखल झाले; पण त्यांच्या आर्थिक स्रोतांवर कधीच तपास झाला नव्हता. त्यामुळे टोळीला अधिक बळकटी मिळाली होती. पोलिसांनी आता त्यांच्या आर्थिक मुळावर घाव घालण्याचे धोरण आखले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई! खिसे भरणाऱ्या चार जणांना अटक! पाहा कोण?
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement