Do You Know : कोणत्या देशाला म्हणतात ‘छोटा भारत’? कॅनेडा किंवा अमेरिका नाही तर हा देश कोणता तिसराच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक देशांमध्ये लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होतो, पण या सगळ्यांमध्ये एक देश असा आहे ज्याला ‘छोटा भारत’ म्हटलं जातं तुम्हाला माहितीय का ते कोणतं?
जगभरातील प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती, परंपरा आणि ओळख असते. पण काही देश असेही आहेत, जिथे भारताचा रंग, सुगंध आणि संस्कृती आजही जाणवते. भारताबाहेरही लाखो भारतीय वेगवेगळ्या देशांत स्थायिक झाले आहेत. काही नोकरीसाठी, काही शिक्षणासाठी, तर काही ऐतिहासिक कारणांमुळे. त्यामुळेच जगातील अनेक ठिकाणी भारतीय संस्कृती, सण आणि खाद्यसंस्कृतीचं सुंदर दर्शन घडतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
फिजीमध्ये स्थायिक झालेल्या या भारतीयांनी केवळ आपली भाषा आणि संस्कृतीच नाही, तर आपले सण-उत्सवही तिथे जिवंत ठेवले. आजही फिजीच्या रस्त्यांवर दिवाळीचे दिवे उजळतात, होळीचे रंग उधळले जातात आणि रामायण सप्ताह मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हिंदी भाषा, भारतीय संगीत आणि पारंपरिक जेवण फिजीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहेत.
advertisement


