रिया चक्रवर्तीने लावला रितेशच्या चेहऱ्याला हात, रागाने लाल झाली जिनिलिया! पार्टीतला 'तो' VIDEO VIRAL

Last Updated:

Riteish Deshmukh-Genelia D'souza: सध्या या गोड जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्यात जिनिलियाचा चेहरा स्पष्टपणे संतापलेला दिसत आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसूझा ही जोडी चाहत्यांची सर्वात आवडती जोडी आहे. रितेश-जिनिलियाची सोशल मीडियावरची धमाल मस्ती आणि त्यांचे क्यूट व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. अनेकदा हे दोघे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांचा हात धरूनच दिसतात. पण सध्या या गोड जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्यात जिनिलियाचा चेहरा स्पष्टपणे संतापलेला दिसत आहे.
एका बॉलिवूड पार्टीमधील हा व्हिडीओ असून यामध्ये रितेश देशमुख, जिनिलिया आणि रिया चक्रवर्ती एकत्र पाहायला मिळत आहेत. पार्टीतून रितेश आणि जिनिलिया बाहेर पडत असताना अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिथे भेटली. यावेळी रितेश आणि रियामध्ये बोलणं सुरू होतं. यावेळी जिनिलियाचा चेहरा पाहण्यासारखा होता. ती वैतागलेली दिसत होती.

रितेशने रियाला 'घरी सोडू का?' म्हणताच जिनिलियाचे हावभाव बदलले

advertisement
रितेश देशमुख रिया चक्रवर्तीशी बोलत होता. बोलता-बोलता रियाने सांगितले की तिच्याकडे गाडी नाही आहे. यावर रितेशने रियाला विचारले, “तुला मी ड्रॉप करू का?” रितेशचे हे बोल ऐकताच त्याची पत्नी जिनिलिया डिसूझाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि नाराजी लपून राहिली नाही. ती अगदी वैतागून रिया आणि रितेशकडे पाहत होती.
advertisement
रितेशच्या प्रश्नावर रियाने लगेच उत्तर दिले, "नाही, माझी कार आहे." तरीही रितेश आणि रिया बोलत असताना जिनिलिया मात्र रागाने बघत होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकरी म्हणत आहेत की, जिनिलियाच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्टपणे सांगत होते की, रितेशने रियाला 'सोडू का' असे विचारणे तिला अजिबात पसंत पडले नाही.
advertisement

रियाने धरले रितेशचे गाल

यानंतर जो प्रसंग घडला, तो आणखी आगीत तेल टाकणारा होता. रिया चक्रवर्ती रितेशची गळाभेट घेण्यापूर्वी जिनिलियाला भेटायला गेली. रियाने जिनिलियाची गळाभेट घेतली, पण जिनिलियाच्या चेहऱ्यावर कोणतेही आनंदी भाव नव्हते आणि तिने रियाला काहीही न बोलता थंड प्रतिसाद दिला. यानंतर रियाने रितेशची गळाभेट घेतली आणि त्याला 'बाय' बोलू लागली. यावेळी 'बाय' बोलताना रियाने थेट रितेश देशमुखच्या दाढीला हात लावला आणि रिया निघून गेली.
advertisement
जिनिलियाने नंतर रियाला आनंदाने 'बाय' केले खरे, पण रितेशने रियाला 'सोडू का' विचारले तेव्हाचे जिनिलियाचे भाव सर्व काही सांगून गेले. सोशल मीडियावर चाहत्यांना हा व्हिडिओ बघून प्रचंड मजा येत आहे आणि जिनिलियाच्या प्रतिक्रियेवर मीम्सही तयार होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
रिया चक्रवर्तीने लावला रितेशच्या चेहऱ्याला हात, रागाने लाल झाली जिनिलिया! पार्टीतला 'तो' VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement