'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शुटिंगवेळी भीषण अपघात, कलाकार साताऱ्याच्या नदीत बुडाला, रितेशही होता लोकेशनवर

Last Updated:

अभिनेता रितेश देशमुख त्याचा आगामी सिनेमा 'राजा शिवाजी' चं शूटिंग करत आहे. मात्र चित्रपट सेटवरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या सेटवर दुर्दैवी घटना
'राजा शिवाजी' चित्रपटाच्या सेटवर दुर्दैवी घटना
प्रतिनिधी सचिन जाधव, सातारा: अभिनेता रितेश देशमुख त्याचा आगामी सिनेमा 'राजा शिवाजी' चं शूटिंग करत आहे. मात्र चित्रपट सेटवरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान, एक डान्सर कलाकार नदीत बुडाल्याची बातमी समोर येत आहे. या बातमीने एकच खळबळ उडाली असून शूटिंग तातडीने थांबवण्यात आलं आहे.
संगम माहुली येथील कृष्णा नदीलगत असलेल्या ठिकाणी बुडाला हा डान्सर कलाकार बुडाला आहे. "राजा शिवाजी" चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना ही घटना घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कलाकार बुडाल्यानंतर काही काळ रितेश देशमुखही नदीकाठी होता.
घटनेनंतर काही वेळ सेटवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. रितेश देशमुख स्वतः काही वेळ नदीकाठी थांबून परिस्थितीचा आढावा घेत होता. चित्रपटाच्या टीमने तात्काळ प्रशासनाला माहिती दिली आणि स्थानिक पोलीस व आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र संध्याकाळपर्यंत कोणताही ठोस परिणाम न मिळाल्यामुळे मोहिम तात्पुरती थांबवण्यात आली. पाण्याचा प्रवाह आणि अंधारामुळे अडचणी येत असल्याचे पथकाने सांगितले आहे. उद्या पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या टीमकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शुटिंगवेळी भीषण अपघात, कलाकार साताऱ्याच्या नदीत बुडाला, रितेशही होता लोकेशनवर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement