बॅालिवूडचा 'रोमान्स किंग', एका दिवसात रेकॉर्ड केली 28 गाणी; गायकाच्या घराबाहेर लागली होती डायरेक्टरची रांग 

Last Updated:

Bollywood Singer : बॅालिवूडचा 'रोमान्स किंग' नावाने ओळखल्या जाणारा गायक, ज्याने एका दिवसात 28 गाणे रेकॅार्ड करुन 'गिनीज वेर्ल्ड रेकॅार्ड' केला होता.

News18
News18
90 च्या दशकात बॅालिवूडला 'रोमान्स किंग' गायक मिळाला. प्रेमी युगुलांना त्याच्या गाण्याने वेड लावले होते. आजही त्या गाण्यांची हमखास मनाला भुरळ पडते. या गायकाचे खरे नाव केदारनाथ भट्टाचार्य आहे. त्याच्या गाण्यात एक वेगळी झलक पाहायला मिळायची. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याची गाणी ऐकल्याशिवाय करमतच नाही. कोरोडो लोकांच्या मनात या गायकाने घर करुन ठेवले होते.
'आशिकी' सिनेमा 1990 मध्ये आला. या सिनेमातील 'नजर के सामने', 'सांसो की जरुरत हे जैसे', 'दिल का आलम' या गाण्यांना त्याला रातोरात स्टार बनवले होते. या सिनेमातील गाणी अजूनही तरुण तरुणींना भूरळ टाकणारी आहेत. या गायकाच्या आवाजात एक जादू होती. ही गाणी ऐकून प्रेमात पडलेल्या लोक आपल्यातच दंग असायचे. हा गायक म्हणजे कुमार सानू. त्यांच्या हिट गाण्यांनंतर त्यांना 'किंग ऑफ मेलोडी' आणि 'रोमांस किंग' म्हणून ओळख मिळाली.
advertisement
कुमार सानूला सलग पाच वेळा 1990-1994 मध्ये सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. या संगीताच्या क्षेत्रातील योगदानामूळे त्याला 2009 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुमार सानूच्या नावे अजून एक रेकॅार्ड आहे.  त्यांनी एका दिवसात 28 गाणी रेकॅार्ड केली होती. जी सगळ्यात कठीण आहेत. त्यानंतर या रेकॅार्डचे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद केलं गेलं.
advertisement
90 मध्ये कुमार सानू प्रसिद्धिच्या शिखरावर
या काळात कुमार सानूचे करियर एकदम उंचावले होते. यावेळी खूप निर्माते आणि संगीतकारांची त्याच्याकडून गाणी गाण्यासाठी रांग लागली होती. कुमार सानूला त्यावेळी 40 दिवस आंतरराष्ट्रीय टूरला जायचे होते. सानूला यावेळी स्टूडिओमध्ये हजर राहणे गरजेचे होते. देशाबाहेर जायची खबर मिळाल्यावर जेवढे निर्माते होते त्यांचे सिनेमे रखडून राहतील त्यामुळे ते सर्व सानूकडे आले. सानूने सर्वांनाच एक दिवस दिला. पण कोणतीही योजना केली नव्हती. एका दिवशी किती रेकॅार्डींग होतील तितकी करायची असे त्याने ठरवले.
advertisement
सानू एक गाणं झाले की लगेच दूसरीकडे वेगवेगळ्या संगीतकार आणि दिग्दर्शकांसोबत गायला जायचा. त्याने सगळी वन टेक गाणी दिली होती. म्हणता म्हणता 28 गाणी रेकॅार्ड झाली. ते वर्ष होते 1993, या 28 गाण्यांनी 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये कुमार सानूचे नाव नोंदवले गेले. यावरुन सानूच्या गायनाचा अंदाज आपल्याला आला असेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॅालिवूडचा 'रोमान्स किंग', एका दिवसात रेकॉर्ड केली 28 गाणी; गायकाच्या घराबाहेर लागली होती डायरेक्टरची रांग 
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement