पुन्हा शाहरुख VS वानखेडे! आर्यनची पहिलीच वेब सीरिज वादात, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण

Last Updated:

Sameer Wankhede : आर्यन खानच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसीरिजमुळे समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला असून शाहरुख खान आणि नेटफ्लिक्सवर वाद निर्माण झाला आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने डायरेक्टरम्हणून इंडस्ट्रीत डेब्यू केला. त्याची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही पहिली वेब सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. रिलीज होताच या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाल. पण आर्यन खानची पहिली सीरिज वादात आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी माननीय दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.  रेड चिलीजने तयार केलेल्या "बॅड्स ऑफ बॉलीवूड" या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांचं एक पात्र दाखवण्यात आलं. सीरिजमध्ये दाखवलेल्या खोट्या, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक व्हिडिओमुळे ते दुखावले असून ही मालिका ड्रग्ज अंमलबजावणी संस्थांचे दिशाभूल करणारी आणि नकारात्मक चित्रण सादर करते असा आरोप त्यांनी केला आहे. कायदा अंमलबजावणी संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो असंही त्यांनी म्हटलं आहे. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मुळे शाहरुख खान आणि समीर वानखेडे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.
शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आदेश, घोषणा आणि नुकसान भरपाईच्या स्वरूपात दिलासा मागतात.
समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित खटला माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि एनडीपीएस विशेष न्यायालय, मुंबई यांच्यासमोर प्रलंबित असताना आणि न्यायप्रविष्ट असताना, समीर वानखेडे यांची प्रतिष्ठा खराब करण्याच्या हेतूने ही सीरिज तयार केली गेली आहे आणि अंमलात आणली गेली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
शिवाय सीरिजमध्ये इतर गोष्टींबरोबरच एक पात्र अश्लील हावभाव करत असल्याचे दाखवले आहे. विशेषतः, राष्ट्रीय चिन्ह 'सत्यमेव जयते' चा जप केल्यानंतर मधली बोट उचलणे हे कृत्य राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या तरतुदींचे गंभीर आणि संवेदनशील उल्लंघन आहे. ज्याच्या कायद्यानुसार दंडात्मक परिणाम होतात. मालिकेतील सामग्री माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता (BNS) च्या विविध तरतुदींचे उल्लंघन करते कारण ती अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री वापरून राष्ट्रीय भावना दुखावण्याचा प्रयत्न करते, असाही आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे.  कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला 2 कोटी नुकसानभरपाईचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्या अंतर्गत NCBने ही कारवाई केली होती. काही दिवसांनी आर्यन खानची निर्दोष सुटका करण्यात आली. त्यानंतर शाहरुख खानने त्याच्या जवान या सिनेमातून समीर वानखेडे यांना इनडायरेक्ट इशारा दिला होता. 'बेटो को हात लगाने से पेहेले उसके बापसे बात कर', असा डायलॉग जवान सिनेमात दाखवण्यात आला होता.
मराठी बातम्या/मनोरंजन/
पुन्हा शाहरुख VS वानखेडे! आर्यनची पहिलीच वेब सीरिज वादात, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement