advertisement

ए झाडखाऊ... एक तरी झाड लाव..! तपोवनचं आंदोलन तापलं, सयाजी शिंदेंनी थेट रॅप साँगच लाँच केलं,VIDEO

Last Updated:

Sayaji Shinde Rap Song : तपोवनाचा वाद सुरू असताना दुसरीकडे अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक रॅप साँग तयार केलं आहे. साँग प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

News18
News18
गेल्या काही महिन्यांपासून नाशिकला होणारा कुंभमेळा आणि त्यासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. तपोवनातील झाडं तोडू देणार नाही यासाठी राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांनीही कंबर कसली आहे. तपोवन येथे आंदोलन करून झाडं तोडू देणार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली. तपोवनाचा वाद सुरू असताना दुसरीकडे अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक रॅप साँगच लाँच केलं आहे.  या रॅप साँगमधून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सयाजी शिंदे हे केवळ अभिनेते नाही तर राजकीय आणि सामाजिक विषयावर भाष्य करणारं व्यक्तिमत्व आहे. सयाजी शिंदे त्यांच्या युट्यूबमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यांनी त्यांच्या युट्यूबवर नवं रॅप साँग रिलीज केलं आहे. 'झाडखाऊ' असं या रॅप साँगचं नाव आहे. झाड कापू नका, आम्ही ती कापूही देणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी या गाण्यातून सरकारला दिला आहे.
advertisement
या गाण्यात सयाजी शिंदे यांच्याबरोबर बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य देखील आहे. स्वत: सयाजी शिंदे यांनी हे रॅप साँग लिहिलं आहे आणि गायलं देखील आहे. गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं असून सयाजी शिंदे यांनी सद्य परिस्थिती या रॅप साँगमधून चपखलपणे मांडली आहे.
advertisement
'लाव लाव लाव झाड लाव झाड लाव... आईसाठी… बापासाठी… पोरासाठी… मुलासाठी… आयटमसाठी… झाड लाव झाड लाव', असं या रॅप साँगचे शब्द आहेत. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. सयाजी शिंदे यांचं प्रेक्षकांची कौतुक केलं आहे.
advertisement
व्हिडीओवर कमेंट करत एकानं लिहिलंय, सुंदर गाणे आणि सामाजिक चांगला संदेश. दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, "सयाजी तुमचं गाणं फारच छान आहे लोकांच्या डोक्यात प्रकाश पडून ते झाड लावायला सुरुवात करतील", आणखी एकानं लिहिलंय, "याला म्हणतात रियल हिरो आणि छान गाणे. सयाजी दादा खूप खूप छान... जिथे विषय गंभीर तिथे सयाजी दादा खंबीर"
advertisement
अभिनेता सयाजी शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षमोहिम हाती घेतली आहे. आजवर त्यांनी हजारो झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. कलाकारांसह सामान्य नागरिकांनाही झाडे लावण्यासाठी ते सातत्याने प्रेरित करत आहेत. सयाजी शिंदे यांनी 'सह्याद्री देवराई' नावाच्या पर्यावरण संवर्धन मोहिमेत आतापर्यंत सुमारे 6.5 लाखाहून अधिक स्थानिक झाडे लावली आहेत आणि त्यांचं संवर्धन केलं आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ए झाडखाऊ... एक तरी झाड लाव..! तपोवनचं आंदोलन तापलं, सयाजी शिंदेंनी थेट रॅप साँगच लाँच केलं,VIDEO
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement