खींच मेरी फोटो! इव्हेंट मुलाचा पण लाइमलाइटमध्ये शाहरुख, आर्यन खानला बनवलं फोटोग्राफर, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shah Rukh Khan Bads of Bollywood : मुंबईत 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रीमियरला शाहरुख खाननं कुटुंबासह हजेरी लावली होती. यावेळी आर्यन ऐवजी शाहरुखच्यात एका कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.
मुंबई : आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' हा शो सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. मुंबईत याचा प्रीमियर सोहळा पार पडला. शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब, बॉलिवूडमधील अनेक प्रमुख व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी प्रीमियरला हजेरी लावली. शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' च्या भव्य प्रीमियरमध्ये पोहोचला. संपूर्ण प्रीमियरमध्ये खान कुटुंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खान कुटुंबावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. डेब्यू जरी आर्यनचा असला तरी शाहरुखच्या एका कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.
'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या प्रीमियरसाठी सुहाना खानने एक आकर्षक, बोल्ड, मांडी-उंच स्लिट मस्टर्ड-पिवळा गाऊन निवडला. तिच्या शेजारी उभा असलेला शाहरुख खान काळ्या रंगाचा ड्रेस कॅरी केला होता. शाहरुख खान कॅज्युअल पण आकर्षक दिसत होता.
advertisement
प्रीमियरसाठी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खानच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. शाहरुखचा मुलगाच काय त्याच्यासमोर कोणीही आलं तरी त्याचं महत्त्व कधीच कमी होणार नाही, त्याची क्रेझ कायम तशीच राहणार हे पुन्हा एकदा दिसून आलं. आणि अर्थात बाप लेकाचं एकमेकांवर असलेलं प्रेम देखील इथे दिसून आलं.
शाहरूखने दिली पापाराझींसोबत पोझ
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, प्रीमियरच्या दरम्यान शाहरुखने सगळ्या पापाराझींच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याबरोबर फोटो काढला. फ्रॅक्चर झालेला हात घेऊन शाहरुख मोठ्या उत्साहात पापाराझींबरोबर फोटो काढताना दिसला. त्याला सेल्फी काढायला होता मात्र हात फ्रॅक्चर असल्याने बापाच्या मदतीला लेक आर्यन धावून आला. त्याने शाहरुखच्या शाहरुखच्या हातून मोबाईल घेतला आणि पापाराझींबरोबर शाहरुखचे काही फोटो क्लिक केले. फक्त एक नाही तर आर्यन व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या अँगलवरून फोटो काढताना दिसत आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या प्रीमियरमध्ये शाहरुखची कृती सर्वाधिक चर्चेत ठरली.
advertisement
advertisement
'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'ची स्टारकास्ट
'द बॅडीज ऑफ बॉलीवूड'मध्ये बॉबी देओल, लक्ष्य, सहेर बंबा, मनोज पहवा, मोना सिंग, मनीष चौधरी, राघव जुयाल, अन्या सिंग, मनोज पहवा आणि विजयंत कोहली, रजत बेदी आणि गौतमी कपूर यांच्यासह. आर्यन खानच्या शोमध्ये सलमान खान, करण जोहर आणि रणवीर सिंगही विशेष उपस्थिती लावताना दिसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 9:36 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
खींच मेरी फोटो! इव्हेंट मुलाचा पण लाइमलाइटमध्ये शाहरुख, आर्यन खानला बनवलं फोटोग्राफर, VIDEO