advertisement

Shekhar Suman Net worth: काँग्रेसच्या तिकिटावर हरले; आता BJP त प्रवेश केलेल्या शेखर सुमन यांच्याकडे किती आहे संपत्ती?

Last Updated:

अभिनेते शेखर सुमन यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. तसं शेखर सुमन यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण त्यात हे हरले होते. आता शेखर सुमन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पण शेखर सुमन किती कोटींचे मालक आहेत जाणून घ्या.

शेखर सुमन
शेखर सुमन
मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वादळ आलं असून अनेक ठिकाणी मतदान देखील झालं आहे. अनेकांचं भविष्य मतदान पेटीत बंद झालं आहे. यातच कंगना रनौत, अरुण गोविल यांच्यासारख्या बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. अशातच अजून एका बॉलिवूड अभिनेत्यानं राजकारणात नवा पक्षप्रवेश केला आहे. सध्या 'हिरामंडी: डायमंड बझार' या वेब सीरीजमुळं चर्चेत असलेले अभिनेते शेखर सुमन यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. तसं शेखर सुमन यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण त्यात हे हरले होते. आता शेखर सुमन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पण शेखर सुमन किती कोटींचे मालक आहेत जाणून घ्या.
शेखर सुमन यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सगळीकडेच खळबळ उडवून दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेखर सुमन राजकारण आणि बॉलिवूडपासून दूर आहेत. हिरामंडी आधी ते 'बिग बॉस 17' च्या सीझनमध्ये वीकेंड होस्ट म्हणून दिसायचे. 'हिरामंडी' मध्ये त्यांनी एका नवाबाची भूमिका साकारली आहे.
सोनाक्षी की मनीषा कोईराला; संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी' साठी कोणी घेतलं सर्वाधिक मानधन?
चित्रपटांपासून दूर आणि राजकारणात अपयशी होऊनही शेखर सुमन यांच्याकडे कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे अनेक आलिशान कार आणि मोटारसायकलही आहेत. शेखर सुमन यांनी छोट्या पडद्यावरून अभिनय विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शेखर सुमन यांनी रेखा आणि माधुरी दीक्षितसह 80-90 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. मात्र, त्यांना स्टारडम मात्र मिळू शकलं नाही.
advertisement
शेखर सुमन यांची 'देख भाई देख' मधील भूमिका लोकप्रिय झाली होती. यातील त्यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर त्यांनी 'लाफ्टर चॅलेंज' मध्ये जज म्हणून ते 'मूव्हर्स अँड शेकर्स' सारख्या चॅट शोचं होस्ट म्हणून खूप लोकप्रियता मिळवली. पण त्यानंतर एक वेळ अशी आली की त्यांच्या हातात काहीच काम राहिलं नाही. 2009 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
advertisement
View this post on Instagram

A post shared by Shekhar Suman (@shekhusuman)

advertisement
शेखर सुमन यांनी पटना साहिबमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. ते शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण शेखर सुमन अभिनयाप्रमाणेच राजकरणातही हरले. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते राजकारणात आले आहेत. तसंच 'हिरामंडी'मधून त्यांना हरवलेलं स्टारडम मिळालं. शेखर आणि त्याचा मुलगा अध्यान सुमन दोघेही या वेब सिरीजमुळं प्रसिद्धीझोतात आले आहेत.
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेखर सुमनकडे महागड्या स्पोर्ट्स बाईकपासून लक्झरी कार आहेत. त्यांचा मुंबईत आलिशान बंगला आहे. पण साधं जीवन जगण्यावर त्यांचा विश्वास आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे सुमारे 20 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shekhar Suman Net worth: काँग्रेसच्या तिकिटावर हरले; आता BJP त प्रवेश केलेल्या शेखर सुमन यांच्याकडे किती आहे संपत्ती?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement