Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरची मोठी घोषणा, आता 'छोटी स्त्री' उडवणार खळबळ; ‘स्त्री 3’ आधीच दिली गुडन्यूज

Last Updated:

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरने एक गुडन्यूज शेअर केली आणि सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे.

श्रद्धा कपूरची मोठी घोषणा
श्रद्धा कपूरची मोठी घोषणा
मुंबई : आयुष्मान खुरानाच्या थामा या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आणि त्यात एक खास घोषणा ऐकून सगळेच थक्क झाले. मंचावर निर्माता दिनेश विजन, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर उपस्थित होते. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते श्रद्धा कपूरच्या धडाकेबाज घोषणेनं. श्रद्धा कपूरने एक गुडन्यूज शेअर केली आणि सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे.
श्रद्धाने सांगितलं की, मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये आता एक नवा सदस्य येत आहे, छोटी स्त्री. हा अॅनिमेटेड चित्रपट मुलांसाठी, कुटुंबासाठी आणि तरुणांसाठी एक धमाका ठरणार आहे. "हा माझा आवडता प्रोजेक्ट आहे. दिनेशने हे सांगितलं तेव्हा मला वाटलं की त्याचं खरं नाव ‘दिनेश व्हिजन’ असावं. कारण त्याच्या कल्पनाशक्तीला तोडच नाही," असं श्रद्धाने हसत हसत सांगितलं.
advertisement
छोटी स्त्रीबद्दल दिनेश म्हणाले, "हा चित्रपट स्त्रीच्या कथा-जगाचा उगम दाखवेल. त्याचा शेवट थेट स्त्री 3शी जोडला जाईल. म्हणजेच प्रेक्षकांना अॅनिमेशनमधून लाईव्ह-ऍक्शन चित्रपटात जाण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे. छोटी स्त्री स्त्री 3च्या सहा महिने आधी रिलीज होईल."
advertisement
या कार्यक्रमात मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा लोगोही सादर करण्यात आला. श्रद्धा कपूरने यावेळी हेही स्पष्ट केले की या युनिव्हर्समध्ये अजून अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत या मालिकेबद्दल आणखी उत्सुकता वाढली आहे.












View this post on Instagram























A post shared by



मराठी बातम्या/मनोरंजन/
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरची मोठी घोषणा, आता 'छोटी स्त्री' उडवणार खळबळ; ‘स्त्री 3’ आधीच दिली गुडन्यूज
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement