जिला आई म्हणायचा, तिलाच बनवली बायको? फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याने खरं काय ते सांगितलंच
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
श्वेता आणि विशालला लग्नाच्या पोशाखात वरमाळा घातलेले पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. या फोटोंमध्ये दोघांनीही गुपचूप लग्न केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Shweta Tiwari Vishal Aditya Singh Viral Wedding Photos: हिंदी मालिका विश्वातील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या तिसऱ्या लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात ती नववधूच्या पेहरावात दिसत आहे. या फोटोंमध्ये असा दावा करण्यात आला आहे की श्वेताने तिचा को-स्टार विशाल आदित्य सिंहशी तिसरे लग्न केले आहे.
या व्हायरल फोटोंमध्ये विशाल आणि श्वेता लग्नाच्या पेहरावात दिसले. दोघांनीही यावेळी वरमाळा घातल्या आहेत. तर दुसऱ्या फोटोंमध्ये श्वेता एका नववधूप्रमाणे स्वयंपाकघरात पदार्थ तयार करत आहे. श्वेता आणि विशालला लग्नाच्या पोशाखात वरमाळा घातलेले पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. या फोटोंमध्ये दोघांनीही गुपचूप लग्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या व्हायरल फोटोंवर अभिनेता विशाल आदित्य सिंहने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
Fact Check: तीसरी बार दुल्हन बनीं 44 की Shweta Tiwari, 36 के विशाल आदित्य सिंह का थामा हाथ! वायरल हुईं फोटोज#ShwetaTiwari #ShwetaTiwariWedding #VishalAdityaSingh #FakePictures #TelevisionNews #BollywoodNews pic.twitter.com/iYVb8QUPnP
— Tadka Bollywood (@Onlinetadka) November 20, 2024
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, विशाल आदित्य सिंहने एका मुलाखतीत सांगितले की, “या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. अशा अफवांमुळे आमच्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ” तो पुढे म्हणाला, “खरं सांगायचं तर जेव्हा मी हे फोटो पाहिले, तेव्हा मला हसू आलं. मी या व्यतिरिक्त काय करू शकतो?”
advertisement
विशाल पुढे म्हणाला, “श्वेता तिवारीसोबतच्या नात्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही. लोकांना जो विचार करायचा आहे, तो करावा. मला आणि तिला आमच्या बाँडबद्दल सर्वकाही माहित आहे. त्यामुळे इतरांना काय वाटते याची आम्हाला पर्वा नाही. जे लोक मला ओळखतात, त्यांना चांगलंच माहित आहे की मी श्वेताला ‘आई’ (माँ) म्हणून हाक मारतो. आमचा बाँड इतका शानदार आणि मजबूत आहे की अशा गोष्टी मला अजिबात त्रास देत नाहीत. हे बघून मला फक्त हसू येतं.”
advertisement
श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंह यांनी ‘बेगूसराय’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत श्वेताने विशालच्या सावत्र आईचे पात्र साकारले होते. तेव्हापासूनच विशाल श्वेताला ‘आई’ (माँ) अशी हाक मारतो. याशिवाय हे दोघेही रोहित शेट्टीच्या स्टंट शो 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2024 5:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जिला आई म्हणायचा, तिलाच बनवली बायको? फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याने खरं काय ते सांगितलंच