Gautami Patil : नवा ट्विस्ट! अपघातग्रस्त रिक्षाचालकाची मुलगी गौतमी पाटीलसोबत दिसली, आभार मानत म्हणाली...

Last Updated:

Gautami Patil accident case : गौतमी पाटीलच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये खुद्द गौतमी, अपघातग्रस्त रिक्षाचालक आणि त्यांचे कुटुंबिय एकत्र दिसत आहेत.

News18
News18
मुंबई : पुण्यातील सिंहगड रोडवर एका अलिशान कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजवली होती. या अपघातात रिक्षा तीन वेळा पलटी झाली आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर कारमधील लोक मदत न करता जागेवरून पळून गेले आणि नंतर टोईंग व्हॅनने ती अज्ञात गाडी काढून नेण्यात आली. नंतर ही गाडी नृत्यांगणा गौतमी पाटीलची असल्याची माहिती समोर आल्याने मोठा राजकीय आणि सामाजिक गदारोळ झाला होता.

चंद्रकांत पाटील यांनी दिले होते कारवाईचे निर्देश 

अपघातानंतर जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी केवळ कारवाईचीच नव्हे, तर गौतमी पाटीलला त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. प्रकरण वाढल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन करून तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. यामुळे गौतमीच्या अडचणी वाढणार असे स्पष्ट दिसत होते.
advertisement

गौतमी पाटीलच्या नव्या व्हिडीओमुळे खळबळ

या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात एक मन हेलावून टाकणारा पण तितकाच अनपेक्षित ट्विस्ट आला आहे. गौतमी पाटीलच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये खुद्द गौतमी, अपघातग्रस्त रिक्षाचालक आणि त्यांचे कुटुंबिय एकत्र दिसत आहेत. यावेळी रिक्षाचालकाच्या मुलीनेच कॅमेऱ्यासमोर सांगितले की, "वडिलांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर गौतमी पाटीलने स्वतः आमच्या घरी येऊन वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली आणि आमची विचारपूस केली. आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्या कुटुंबाची भेट घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत."
advertisement












View this post on Instagram























Shared post on



advertisement

आता कायदेशीर लढाईचे काय?

गौतमी पाटीलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत असल्या तरी, गौतमीने सहानुभूती मिळवली की, केवळ कायदेशीर पेचातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, याची चर्चा सुरू आहे. रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गौतमीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असली तरी, हे कायदेशीर प्रकरण थांबणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil : नवा ट्विस्ट! अपघातग्रस्त रिक्षाचालकाची मुलगी गौतमी पाटीलसोबत दिसली, आभार मानत म्हणाली...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement