लव्ह जिहादचा आरोप, धमक्या अन् टीका; 12 वर्षांनी सोहाने सांगितली सैफ-करीनाच्या लग्नामागची गोष्ट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Interfaith Marriage : सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या आंतरजातीय विवाहला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण ज्यावेळी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना खूप धमक्या मिळाल्या होत्या. पण दोघांनीही हिंमत दाखवत लग्न केलं. आता सोहा अली खानने याबद्दल भाष्य केलं आहे.
Soha Ali Khan on Saif Kareena Marriage : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान 16 ऑक्टोबर 2012 मध्ये लग्नबंधनात अडकले. बॉलिवूड जोडप्याच्या या आंतरजातीय विवाहाची चांगलीच चर्चा रंगली होती. काही चाहत्यांना त्यांच्या लग्नाबद्दल आनंद झाला होता. तर काहींनी मात्र ट्रोल केलं. नुकतचं सोहा अली खानने आपला भाऊ सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे. सोहाने सांगितलं की,"सैफ आणि करीनाला लग्नाच्या वेळी बरीच टीका सहन करावी लागली होती. दोघं वेगवेगळ्या धर्मांचे असल्यामुळे त्यांचं नातं सतत लोकांच्या नजरेत होतं. लग्नाच्या वेळी त्यांना धमक्याही आल्या, ज्या त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याच्या होत्या. पण तरीही दोघांनी आपल्या निर्णयावर ठाम राहणं पसंत केलं".
सैफ आणि करीनाने ऑक्टोबर 2012 मध्ये अत्यंत खाजगी पद्धतीत लग्न केलं. सैफ-करीनाच्या या धाडसी निर्णयामुळे नंतर सोहा आणि कुणाल यांच्या आंतरजातीय लग्नावर फारशी टीका झाली नाही. सोहाने एका यूट्यूब चॅनेलवर नयनदीप रक्षित यांच्याशी बोलताना सांगितले की, तिला आपल्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल कधीही विरोध जाणवला नाही. सोहा म्हणाली,"माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं हे आहे की माझ्या जवळची आणि ज्यांच्याबद्दल मला खरंच काळजी आहे ते माझ्या सोबत आहेत. लोकांची स्वतःची मतं असतात आणि ती असणंदेखील महत्त्वाचं आहे."
advertisement
सैफ-करीनाच्या लग्नावेळी झालेला मोठा वाद
सोहा पुढे म्हणाली,"जर लोकांनी द्वेष केला किंवा टीका केली, तरी मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबाचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचा पाठिंबा. जेव्हा सैफ आणि करीना यांचं लग्न झालं, तेव्हा अनेक वाद निर्माण झाले होते. लव्ह जिहाद, घरवापसी अशा पद्धतीचे बातम्यांचे मथळे होते. अशा गोष्टी होतात तेव्हा कुटुंबाचा आणि जोडीदाराचा पाठिंबा महत्त्वाचा असतो".
advertisement
रणधीर कपूरांना मिळाले होते धमकीचे पत्र
सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, करीना कपूरचे वडील रणधीर कपूर यांनादेखील काही धमकीची पत्र मिळाली होती. पण सैफने या धमक्यांमुळे कधीच भीती दाखवली नाही. त्याने सांगितले की,"कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्याला धीर मिळाला. माझ्या पालकांनाही 1960 च्या दशकात अशाच टीका सहन कराव्या लागल्या होत्या. धमकी देणं आणि ती प्रत्यक्षात आणणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे मी नेहमी शांत आणि ठाम राहिलो".
advertisement
शर्मिला टागोर यांनाही मिळाल्या होत्या धमक्या
सैफच्या या विचारसरणीने करीना कपूरलाही धैर्य मिळाले. सैफ आणि करीनाने एकत्रितपणे या सगळ्या अडचणींना सामोरं गेलं आणि आपलं प्रेम पुढे नेत राहिले. त्यांचं हे धैर्य नंतर सोहा आणि कुणालसाठीही प्रेरणा ठरलं.
शर्मिला टागोर यांनीदेखील त्यांच्या लग्नाच्या काळातील आठवणी शेअर केल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, कोलकात्यात त्यांच्या लग्नादरम्यान त्यांच्या कुटुंबाला धमक्या मिळाल्या होत्या, ज्यामध्ये लिहिलं होतं – “बुलेट्स बोलेंग”. त्यामुळे कुटुंब थोडं चिंतेत होतं. पण तरीही त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अखेरीस त्यांचं लग्न आनंदात आणि शांततेत पार पडलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 12:14 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
लव्ह जिहादचा आरोप, धमक्या अन् टीका; 12 वर्षांनी सोहाने सांगितली सैफ-करीनाच्या लग्नामागची गोष्ट