मोठ्या पडद्यावरचा खलनायक, खऱ्या आयुष्यात हीरो, मोलकरणीच्या नावे केली कोट्यवधींची संपत्ती, पण का?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
South Superstar : मोठ्यापडद्यावरच्या सुपरस्टार खलनायकाने आपली संपत्ती मोलकरणीच्या नावे केली. वास्तवात झाले हीरो. सुसाइड नोटमध्ये केला खूलासा.
South Superstar : साऊथ मध्ये असे काही लोकप्रिय अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयातूनच नाही तर आपल्या वेगळ्या कामातूनही आपली ओळख निर्माण केली. ते खलनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्या जीवनात त्यांनी खूप संघर्ष केला. अनेक सुपरहीट तमिळ, तेलुगु आणि कन्नड सिनेमातून कामे केली आहेत. पण हा अभिनेता या जगाला सोडून गेल्यानंतर जास्त लोकप्रिय झाला. असा तो खलनायक साकारणारा वास्तव जीवनात झाला खरा हिरो.
सिनेमा ' बुध्दिमंतुडु'
आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्याविषयी सांगणार आहोत. ज्याने साऊथ इंडस्ट्री गाजवली होती. त्या अभिनेत्याचे नाव आहे सुपरस्टार रंगनाथ. त्यांचा जन्म 1946 मध्ये चेन्नईत झाला. तो रेल्वे तिकिट कलेक्टर होता. त्यांचं त्या सरकारी नोकरीमध्ये मन लागत नव्हतं. त्यांना अभिनेता व्हायचे होते. म्हणून त्यांनी सरकारी नोकरी सोडली.
advertisement
300 पेक्षा जास्त सिनेमातून केले खलनायकाचे काम
1969 मध्ये 'बुध्दिमंतुडु' या सिनेमातून त्यांनी डेब्यू केले. या सिनेमातून रंगनाथ यांना खास ओळख मिळाली नाही. त्यानंतर 1974 मध्ये 'चंदना' सिनेमातून रातोरात तो स्टार झाला. त्याने 40 पेक्षा जास्त सिनेमातून हिरोची भूमिका केली आहे आणि 300 पेक्षा जास्त सिनेमातून खलनायक भूमिका केली आहे.
अभिनेता डिप्रेशन मध्ये गेला होता.
रंगनाथ यांच्या जीवनात खूप दु:ख होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यामुळे त्याचे मानसिक संतूलन बिघडले होते. त्यामुळे 2015ला आपल्याच घरात त्यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे साऊथ मध्ये शोककळा पसरली होती.
advertisement
कामवालीच्या नावे संपत्ती केली
रंगनाथ यांच्या आत्महत्येच्या नोटमध्ये त्याने लिहीलेले पाहून आश्चर्य वाटेल. त्यांची मुलगी नीरजाने सांगीतले की, "त्यात त्यांनी लिहिले होते की, मीनाक्षी आमच्या घरात काम करत होती. तिने माझ्या आई-वडिलांचा शेवटच्या वेळी काळजी घेतली होती. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझे वडील तिच्यावर विश्वास ठेवायचे. तिच्या नावावर प्रॅापर्टी खरेदी केली होती."
advertisement
रंगनाथ यांची ही कृती आयुष्याच्या शाळेला खूप मोठा धडा देणारी आहे. मोठ्या पडद्यावर खलनायक असले तरी वास्तवात या व्यक्तीत एक खरा माणूस दडला होता हे नक्की.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 11:22 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मोठ्या पडद्यावरचा खलनायक, खऱ्या आयुष्यात हीरो, मोलकरणीच्या नावे केली कोट्यवधींची संपत्ती, पण का?